88% ने आपटून ₹13 वर आला हा शेअर, आता कंपनीनं घेतला मोठा निर्णय; एक्सपर्ट्सचा मूडही बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:42 PM2024-03-26T15:42:38+5:302024-03-26T15:53:19+5:30

व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने 27 फेब्रुवारीला ₹45,000 कोटींचा निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे.

टेलीकॉम सर्विस प्रोव्हायडर कंपनी व्होडाफोन आयडियाचा शेअर आज मंगळवारी फोकसमध्ये होता. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 2% पर्यंत घसरला. आज तो 13.17 रुपयांच्या इंट्राडे लोवर पोहोचला आहे.

दुसरीकडे, ब्रोकरेज फर्म यूबीएसने व्होडाफोन आयडियाच्या शेअर प्राइसमध्ये नुकत्याच झालेल्या सुधारणेनंतर रेटिंगमध्ये बदल करून ती 'न्यूट्रल' केली आहे. यापूर्वी याला 'सेल' रेटिंग देण्यात आली होती.

यूबीएसने व्होडाफोन आयडियावरील आपली टार्गेट प्राइस पूर्वीच्या ₹11.5 वरून वाढवून ₹13.1 केली आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 18.42 रुपये आहे. यानुसार हा शेअर सध्या 28% ने घसरला आहे.

₹45,000 कोटींचा फंड उभा करणार कंपनी - व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने 27 फेब्रुवारीला ₹45,000 कोटींचा निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे. यांपैकी ₹20,000 कोटी इक्विटी अथवा इक्विटी-लिंक्ड इंस्ट्रूमेंट्सच्या माध्यमाने उभारले जातील.

यातच, व्होडाफोन आयडियाने नुकत्याच केलेल्या घोषणेतून असा संकेत मिळतो की, कंपनी मोठा निधी उभारण्याच्या अगदी जवळ आहे, असे यूबीएसने म्हटले आहे.

यूबीएसच्या मते, व्होडाफोन आयडिया आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रति वापरकर्ता सरासरी महसूलात 13% ते 15% ची वृद्धी नोंदवेल. तसेच यानंतर 6% ते 8% दरम्यान वार्षिक चक्रवाढीनुसार वाढेल, असा अंदाज आहे.

अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती - व्होडाफोन आयडियाचा शेअर गेल्या एका महिन्यात 22% आणि गेल्या सहा महिन्यांत YTD मध्ये आतापर्यंत 21% पर्यंत घसरला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात हा शेअर 120% पर्यंत वधारला होता. या काळात याची किंमत 6 रुपयांनी वाढून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.

2015 मध्ये या शेअरची किंमत 118 रुपये होती. या हिशेबाने हा शेअर आतापर्यंत तब्बल 89% पर्यंत घसरला आहे. या शेअरचे मार्केट कॅप 64,598.12 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)