2023 मध्ये हे 4 शेअर करू शकतात मालामाल; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:44 PM2023-01-04T13:44:10+5:302023-01-04T13:56:20+5:30

असेच 4 स्‍टॉक्‍स ब्रोकरेज फर्म शेअरखानने लॉन्‍ग टर्मसाठी आपल्या इन्‍व्हेस्‍टमेंट आयडियात सामील केले आहेत.

शेअर बाजारात आज घसरण झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेंसेक्स 310 अंकांनी घसरून 61000 च्या खाली आला आहे. तसेच, निफ्टीही 95 अंकांनी घसरून 18136 वर आली आहे. असे असतानाही कॉर्पोरेट अपडेट्सनुसार, अनेक कंपन्यांचे शेअर गुंतवणूकीचा विचार करता चांगले दिसत आहेत. असेच 4 स्‍टॉक्‍स ब्रोकरेज फर्म शेअरखानने लॉन्‍ग टर्मसाठी आपल्या इन्‍व्हेस्‍टमेंट आयडियात सामील केले आहेत.

Coforge वरही शेअरखानने खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 4680 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, आज या स्टॉकमध्येही घसरण दिसून आली आहे. हा शेअर सकाळी 3998.15 रुपयांवर ट्रेड करत होता. भविष्यात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 682 रुपयांपर्यंचा परतावा मिळू शकतो.

शेअरखानने सन फार्माला 1300 रुपयांची टार्गेट प्राइस देत खरेदीचाही सल्ला दिला आहे. आज या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. सकाळच्या सुमारा, हा शेअर 1.08 टक्क्यांच्या उसळीसह 1020 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना भविष्यात 28 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

Coal India संदर्भात Sharekhan बुलिश आहे. हे शेअर खरेदी करण्याचा सल्लाही फर्मने दिला आहे. शेअरखानने कोल इंडियाची टारगेट प्राईस 280 रुपये एवढी ठेवली आहे. आज हा शेअर 2.23 टक्क्यांच्या घसरणीसह 218.95 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. अशात भविष्यामध्ये 60 रुपये अथवा 28 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

याच बरोबर, Kotak Mahindra Bank वरही ब्रोकरेज फर्मने खरेदीचा सल्ला दिला आहे. बँकेच्या शेअरची टार्गेट प्राईस 2250 रुपये एवढी आहे. आज सकाळी 10:18 वाजताच्या सुमारास, घसरणीसह 1830.75 रुपयांवर ट्रेड रत होता. या शेअरचा भाव 1,835 रुपये होता. अशात गुंतवणूकदारांना भविष्यात प्रति शेअर 420 रुपयांचा परतावा मिळू शकतो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)