Multibagger Stock: याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:42 PM2022-11-22T13:42:45+5:302022-11-22T13:48:28+5:30

Share Market Investment Tips: अल्पावधीच या कंपनीने प्रचंड मोठा परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? जाणून घ्या डिटेल्स...

आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाली होताना दिसत आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक रेकॉर्ड ब्रेक बेंचमार्ककडे वाटचाल करत आहे. अनेकविध कंपन्या आपल्या जोरदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. (Multibagger Stock Share Market)

यातच काही तज्ज्ञांच्या मते आगामी तीन ते चार वर्षांत शेअर मार्केटचा निर्देशांक १ लाख अंकांचा टप्पा गाठू शकेल. भारतीय शेअर मार्केटची स्थिती सकारात्मक असल्याचा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यातच शेअर बाजारात अशा काही मल्टिबॅगर कंपन्या आहेत, ज्याच्या भन्नाट परताव्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत होत आहेत. (Share Market Investment Tips)

अनेकविध क्षेत्रातील मल्टिबॅगर शेअर असलेली कंपनी म्हणजे कामा होल्डिंग्स. (Kama Holdings) या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर स्टॉक कॅटेगरीत आला असून, सुरुवातीच्या काळात १३ रुपयांवर प्रारंभ झालेला शेअर आताच्या घडीला १४ हजारांवर गेला आहे. गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा प्रचंड मोठा लाभ मिळाला असून, १ लाखाचे १० कोटी झाल्याचे सांगितले जात आहे.

२६ जुलै २००२ रोजी Kama Holdings या कंपनीच्या शेअरची किंमत १३.४५ रुपये होती. आता २० वर्षांनंतर हाच शेअर १४ हजारांवर गेला आहे. या स्टॉकने २००५ मध्ये प्रथमच १०० रुपयांची पातळी ओलांडली होती. तर २०१५ मध्ये १ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला.

यानंतर Kama Holdings या कंपनीच्या शेअरने कधीच मागे वळून पाहिले नाही. सातत्याने रॉकेट स्पीडने कामगिरी करत नवनवे उच्चांक गाठले. ऑगस्ट २०२१ मध्ये कामा होल्डिंग्सच्या शेअरने १० हजारांचा टप्पा गाठला. तर सप्टेंबर २०२२ मध्ये १४ हजार रुपयांवर या कंपनीचा स्टॉक गेला.

Kama Holdings कंपनीच्या स्टॉक अलीकडेच सर्वकालीन उच्च आणि ५२ आठवड्यांची उच्च किंमत १४ हजार ६०० रुपये आहे. तर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी शेअरची बंद किंमत १३ हजार ५०० रुपये आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने २०२२ मध्ये कामा होल्डिंग्जच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आताच्या भावानुसार, १०,४२,७३,२०० रुपये मिळाले असते. दुसरीकडे १३ हजार २५० रुपये प्रति शेअर प्रमाणे पाहिले तर शेअर्सची किंमत ९,४६,३१,५०० रुपये झाली असती.

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात हजारो शेअर्स आहेत, ज्यांचे दररोज व्यवहार होतात. त्याच वेळी, या हजारो शेअर्समधून सर्वोत्तम स्टॉक शोधणे खूप कठीण काम आहे. यासाठी खूप संशोधन आवश्यक आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात चांगला नफा दिला आहे.

असे अनेक स्टॉक मल्टिबॅगर शेअरच्या यादीत येतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी ती अभ्यासपूर्वक करावी. कंपनीचा प्रवास, आताची शेअर किंमत आणि भविष्यातील अंदाज याचा आढावा घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.