मल्टीबॅगर शेअरचं 'तुफान'! 3 वर्षात ₹103 वरून थेट ₹10000 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:49 PM2024-02-13T23:49:31+5:302024-02-13T23:56:00+5:30

मल्टीबॅगर कंपनीने या कालावधीत गुंतवणूकदारांना 10000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

शेअर बाजारात एसजी मार्टच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एसजी मार्टचा शेअर्स गेल्या केवळ 3 वर्षांतच 103 रुपयांवरून थेट 10000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मल्टीबॅगर कंपनीने या कालावधीत गुंतवणूकदारांना 10000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

आता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. एसजी मार्टने 1:1 प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर देणार आहे. याशिवाय, कंपनी अपले शेअर देखील वाटत आहे. एसजी मार्टने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 22 फेब्रुवारी 2024 निश्चित केली आहे.

3 वर्षात 10000% हून अधिकची उसळी - एसजी मार्टच्या शेअरच्या किंमतीत गेल्या 3 वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. 12 फेब्रुवारी 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 103.85 रुपये होती. तो 13 फेब्रुवारी 2024 रोजी रु. 10609.15 वर बंद झाला आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 10115% ची वाढ झाली आहे.

ही स्मॉलकॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअरचे गिफ्ट देत आहे. कंपनीच्या शेअचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12770 रुपये एवढा आहे. तसेच, नीचांक 342.95 रुपये एवढा आहे.

6 वर्षात 15000% हून अधिक तेजी - एसजी मार्टच्या शेअरमध्ये गेल्या 6 वर्षात 15987% ची तेजी आली आहे. 21 फेब्रुवारी 2018 रोजी कंपनीचा शेअर 65.95 रुपयांवर होते. तो 13 फेब्रुवारी 2024 रोजी 10609.15 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या 5 वर्षा एसजी मार्टच्या शेअरमध्ये 9918 पर्सेंटची उसळी घेतली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 105.90 रुपयांवरून 10609.15 रुपयांवर पोहोचला आहे.

तसेच, गेल्या एक वर्षाचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये 2475 पर्सेंटची तेजी आली आहे. तर 6 महिन्यांचा विचार करता, कंपनीचा शेअर 241 पर्सेंटने वधारला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)