इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:23 PM2024-05-15T17:23:12+5:302024-05-15T17:32:05+5:30

Israel vs South Africa in International Court: पॅलेस्टाइनच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे

Israel Hamas war tension rises on Palestine Gaza South Africa International court | इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी

इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी

Israel vs South Africa in International Court: हमाससोबत युद्ध करणारा इस्रायल ( Israel Hamas War ) आता काहीसा तणावात असल्याचे दिसत आहे. इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात १६ आणि १७ मे रोजी एका महत्त्वाच्या विषयावर सुनावणी होणार आहे. गाझा पट्टीमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या प्रकरणी दक्षिण आफ्रिकेने याचिका दाखल केली आहे. यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पॅलेस्टाइनच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यामध्ये पॅलेस्टाइन लोकांच्या हक्कांचे गंभीर नुकसान होत असल्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. तसेच इस्रायलला शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

पॅलेस्टाइन नागरिकांची गाझातील सध्याची परिस्थिती १९४८ च्या अरब-इस्त्रायल युद्धापेक्षाही भयंकर असल्याचा दावा करण्यात येत आहे. अरब-इस्त्रायल युद्धापूर्वी आणि दरम्यान सुमारे सात लाख पॅलेस्टाइन नागरिकांना पळून जावे लागले होते. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये सुरू झालेल्या युद्धात 3,5000 पॅलेस्टिनी मारले गेल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली नागरिक मारले गेले. युद्धामुळे गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना सुमारे 17 लाख लोकांना आपली घरे सोडून पळावे लागले. 1948च्या युद्धापूर्वी आणि दरम्यान स्थलांतरित झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.

सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील पॅलेस्टाइन सहाय्यक प्राध्यापक यारा अस्सी यांनी युद्धामुळे नागरी पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीचा अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, गाझा पुनर्बांधणीसाठी कोणत्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची आवश्यकता असेल याची कल्पना करणे फार कठीण आहे.

Web Title: Israel Hamas war tension rises on Palestine Gaza South Africa International court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.