₹32 च्या स्टॉकची कमाल, 2 महिन्यात दिला 500% बंपर परतावा; या सरकारी कंपनीचा शेअर करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:21 PM2024-02-02T17:21:01+5:302024-02-02T17:35:36+5:30

32 रुपयांवरून 195 रुपयांवर पोहोचला शेअर...!

सरकारी कंपनी इरेडा (IREDA) च्या शेअरने गेल्या अवघ्या 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. IREDA चा IPO 2 महिन्यांपूर्वी 32 रुपये किमतीवर आला होता. हा शेअर आता 195 रुपयांवर पोहोचला आहे.

32 रुपयांवरून 195 रुपयांवर पोहोचला शेअर इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा आयपीओ प्राइस बँड 30-32 रुपये होता. कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी खुला झाला होता आणि 23 नोव्हेंबरपर्यंत ओपन होता. कंपनीचा शेअर 29 नोव्हेंबर 2023 रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता.

लिस्टिंग झाल्यापासून इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी आहे. आता कंपनीचा शेअर 195.05 रुपयांवर पोहोचला आहे. इरेडाचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेन्जवर लिस्ट झाल आहे.

240 रुपयांपर्यंत जाऊ शकतो शेअर - जीसीएल ब्रोकिंगचे रिसर्च एनालिस्ट वैभव कौशिक यांच्या मते, राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 1 कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनल वावण्यात येणार आहेत. निश्चितपणे या प्रोजेक्टचा इरेडाला फायदा होणार.

कौशिक म्हणाले, येणाऱ्या महिन्यात सरकारी कंपनी इरेडाचा शेअर 240 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. 139 रुपयांवर स्टॉप लॉस कायम ठेवणे आवश्यक आहे. कौशिक यांनी बिझनेस टुडेसोबत बोलताना यासंदर्भात भाष्य केले आहे.

कौशिक म्हणाले, येणाऱ्या महिन्यात सरकारी कंपनी इरेडाचा शेअर 240 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. 139 रुपयांवर स्टॉप लॉस कायम ठेवणे आवश्यक आहे. कौशिक यांनी बिझनेस टुडेसोबत बोलताना यासंदर्भात भाष्य केले आहे.

इरेडाचा आयपीओ एकूण 38.80 पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा कोटा 7.73 पट सब्सक्राइब झाला.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)