पाहा २०० रूपयांपेक्षा स्वस्त Reliance Jio चे प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतोय डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:34 PM2021-03-25T18:34:41+5:302021-03-25T18:38:17+5:30

Reliance Jio : पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि कोणते मिळतायत बेनिफिट्स

रिलायन्स जिओकडे २४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंतच्या वैधतच योजनांचे रिचार्ज उपलब्ध आहेत. काही रिचार्जसह दररोज 3 जीबीपर्यंत डेटा दिला जातो.

ज्या वापरकर्त्यांना दररोज अधिक डेटाची आवश्यकता असते अशा वापरकर्त्यांसाठी या ऑफर्सचा चांगला उपयोग होतो. काही रिचार्ज ऑफर्समध्ये वैधता आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रिप्शनही दिलं जातं.

जिओचे अनेक प्लॅन्स आहेत ते अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. परंतु तुम्ही कमी प्रमाणात डेटा वापरत असाल तर तुमच्यासाठी हे प्लॅन्स उत्तम ठरू शकतात.

आम्ही तुम्हाला २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅन्स आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत.

१२९ रूपयांचा प्लॅन हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही क्रमांकावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते.

जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण २ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय योसोबत ग्राहकांना ३०० एसएमएसचाही लाभ घेता येतो. जिओ या प्लॅनसोबत ग्राहकांना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देतं.

रिलायन्स जिओच्या १४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता देण्यात येते. या प्लॅनमध्येही ग्राहकांना कोणत्याही क्रमांकावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते.

तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो. म्हणजेच २४ दिवसांसाठी ग्राहकांना २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

२०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचा रिलायन्स जिओकडे असलेला तिसरा प्लॅन म्हणजे १९९ रूपयांचा. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा देण्यात येतो.

याशिवाय या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते. याव्यतिरिक्त ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.