शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance च्या शेअरमधील पडझड कायम; मुकेश अंबानींचे ४० हजार कोटींचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 6:35 PM

1 / 10
मुंबई: एकीकडे शेअर बाजाराची उच्चांकी, विक्रमी घोडदौड सुरू असताना दुसरीकडे मात्र दिग्गज उद्योजकांच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत.
2 / 10
गेल्या आठवड्यात आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे शेअर्स पडल्यानंतर, आता याच यादीत आघाडीवर असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे शेअर्स कोसळले आहेत.
3 / 10
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक जिओ स्मार्टफोनसह अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, अपेक्षित घोषणा आणि भविष्यातील योजनांबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने त्याचे पडसाद कंपनीच्या शेअरवर उमटल्याचे सांगितले जात आहे.
4 / 10
रिलायन्सची शेअर बाजारातील पडझड कायम असल्याचे पाहायला मिळत असून, शेअरमधील ३ ते ५ टक्क्यांच्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांचे सुमारे ४० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
5 / 10
दोन सत्रात रिलायन्सच्या शेअरमधील घसरणीने कंपनीचे बाजार भांडवल १.३९ लाख कोटीने कमी झाले आहे. शुक्रवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये २.८ टक्के घसरण झाली. तो २०९३.२० रुपयांपर्यंत खाली आला. महिनाभरात त्याची नीचांकी पातळी आहे.
6 / 10
गेल्या सलग चार सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तो ६.५ टक्क्यांनी घसरला आहे. आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसाय विस्ताराच्या भरवशाच्या योजना सादर करेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा होती, असे म्हटले जात आहे.
7 / 10
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी घसरण नोंदवण्याची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीच्या १२ वार्षिक सर्वसाधारण सभांपैकी ८ वेळा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने घसरण नोंदवली आहे.
8 / 10
गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र भांडवली बाजारात आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ५१.७५ रुपयांच्या घसरणीसह २१५३.३५ रुपयांवर बंद झाला होता.
9 / 10
निफ्टीवरही रिलायन्सचा शेअर ५१.८५ रुपयांच्या घसरणीसह २१५३.५० वर बंद झाला होता. ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स हरित ऊर्जा क्षेत्रात ७५ हजार कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.
10 / 10
तसेच सर्वांना परवडेल अशा स्मार्टफोनची देखील घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओ तसेच जिओ मार्टच्या आयपीओबाबत, सौदी अरामकोसोबतच्या व्यवहाराबाबत कोणतीही डेडलाईन त्यांनी स्पष्ट केली नाही.
टॅग्स :Relianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसायshare marketशेअर बाजार