Mukesh Ambani: बहुचर्चित मुकेश अंबानींच्या साम्राज्याला 'ग्रहण'; टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:37 PM2021-03-16T12:37:03+5:302021-03-16T12:43:10+5:30

Mukesh Ambani Billionaire list: रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानावर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

Bloomberg Billionaires Index नुसार मुकेश अंबानी हे 82.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील अब्जाधिशांच्या यादीच 11 स्थानावर फेकले गेले आहेत. ते आधी चौथ्या स्थानावर होते.

अमेरिकेचे लॅरी एलिसन पुन्हा 10 व्या स्थानावर आले आहेत. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये या वर्षात 5.43 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.

रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानावर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते.

यामुळे अंबानींची संपत्तीही 90 अब्ज डॉलरवर गेल्याने ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले होते. मात्र, यानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये झपाट्याने घसरण झाली आणि त्याचा फटका अंबानींनाही बसला आहे.

या यादीमध्ये 26 व्या स्थानावर असलेले अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांना यंदाचे कोरोनाचे वर्ष चांगलेच फळले आहे. त्यांच्या संपत्तीत 16.6 अब्ज डॉलरची वाढ झाली. यामुळे त्यांची संपत्ती 50.4 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Bloomberg Billionaires Index नुसार सर्वाधिक चर्चेत असलेली ऑटो कंपनी टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी पुन्हा एकदा जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

मस्क यांची संपत्ती 182 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. तर अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्ती 181 अब्ज डॉलर एवढी असून ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे 139 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

जगातील सर्वात मोठी लक्झरी गुड्स कंपनी LVMH Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड आरनॉल्ट हे 124 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

फेसबुकचा मार्क झकरबर्ग 104 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहे.