जबरदस्त! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा फक्त ५० रुपये, मिळतील ३५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:38 AM2023-06-07T11:38:08+5:302023-06-07T11:58:30+5:30

या योजनेत सरकारकडून तुम्हाला पूर्ण ३५ लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना राबविल्या जातात. ग्राहकांच्या फायद्यासाठी या योजना लाँच केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण ३५ लाख रुपये मिळतील.

तुम्हालाही जोखीम न घेता करोडपती बनायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी हे अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात.

या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण ३५ लाख रुपये मिळतात. ही योजना इंडिया पोस्टने ग्राहकांसाठी सुरू केली होती.

या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण ३५ लाख रुपये मिळतात. ही योजना इंडिया पोस्टने ग्राहकांसाठी सुरू केली होती.

ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील.

जर तुम्ही या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केली तर येत्या काळात तुम्हाला ३१ लाख ते ३५ लाख रुपयांचा फायदा मिळेल.

एखाद्या व्यक्तीने वयाच्या १९ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा ५५ वर्षांसाठी मासिक प्रीमियम १५१५ रुपये, ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये असेल.

पॉलिसी खरेदीदाराला ५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपये आणि ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

गुंतवणुकीचे नियम- १९ ते ५५ वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम १०,००० ते १० लाख रुपये असू शकते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.

तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. ही योजना घेतल्यानंतर ३ वर्षांनी तुम्ही ती सरेंडरही करू शकता.