Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:44 IST2026-01-03T09:18:41+5:302026-01-03T09:44:36+5:30
Post Office Investment Scheme: सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. पाहूया कोणती आहे ही स्कीम, ज्यात दरमहा २० हजार रुपयांची कमाई होऊ शकते.

Post Office Investment Scheme: सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. त्यापैकीच एक गुंतवणूक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.

६० वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. तसंच, ५५ वर्षांपेक्षा जास्त आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. याशिवाय ५० वर्षांपेक्षा जास्त आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

मात्र, या दोघांसाठी अट अशी आहे की, त्यांनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत गुंतवणूक केलेली असावी. या बचत योजनेवर सध्या ८.२% दरानं व्याज मिळत आहे.

SCSS योजनेत किमान गुंतवणूक १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपये आहे. जर तुम्ही ८.२% व्याजदराने ३० लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला वर्षाला २.४६ लाख रुपये मिळतील, जे दरमहा सुमारे २०,००० रुपये होतात.

व्याजाचा भरणा त्रैमासिक आधारावर १ एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये केला जातो. जर मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला, तर खातं बंद केलं जातं आणि रक्कम वारसाला (Nominee) दिली जाते.

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नसते कारण सरकार याची हमी घेते. यासोबतच चांगली गोष्ट ही आहे की, SCSS योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळतो.

आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याज कमी केले आहे. अशा काळात SCSS योजना एक जबरदस्त पर्याय आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करून फिक्स परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिस वरिष्ठ नागरिक बचत योजनेत आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो.

















