पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:04 IST2025-11-17T08:49:38+5:302025-11-17T09:04:10+5:30

Post Office Investment Scheme: पोस्ट ऑफिसची ही स्कीम अशा लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, ज्यांना आपली बचत सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे आणि दर महिन्याला काही निश्चित कमाई हवी आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम.

Post Office Investment Scheme: पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme - MIS) अशा लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, ज्यांना आपली बचत सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे आणि दर महिन्याला काही निश्चित कमाई हवी आहे. ही योजना विशेषतः सेवानिवृत्त लोक, गृहिणी, व्यस्त व्यावसायिक आणि जोखीम टाळून स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्या कुटुंबांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. MIS स्कीमवरील सरकारद्वारे निश्चित केलेला व्याजदर वर्षातून चार वेळा आढावा घेऊन घोषित केला जातो, पण एकदा गुंतवणूक केल्यावर ५ वर्षांपर्यंत व्याजदरात कोणताही बदल होत नाही.

ही योजना समजून घेणं खूप सोपं आहे. MIS हे असं खातं आहे, ज्यात तुम्ही एकदा रक्कम जमा करता आणि दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात पेन्शनसारखी निश्चित रक्कम मिळत राहते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पती-पत्नीच्या जोडप्यानं संयुक्त खात्याअंतर्गत ₹४ लाख जमा केले, तर ७.४% च्या व्याजदरानं त्यांना दर महिन्याला ₹२,४६७ मिळतील.

वास्तविक, ही रक्कम फक्त व्याज असते, तुमची मूळ रक्कम ५ वर्षांपर्यंत सुरक्षित राहते आणि मुदत पूर्ण झाल्यावर ती पूर्णपणे परत मिळते. संयुक्त खात्याचे फायदेही कमी नाहीत. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक सहभागी होऊ शकतात आणि गुंतवणुकीची मर्यादा ₹१५ लाखांपर्यंत वाढते.

त्यामुळे जर एखाद्या कुटुंबाला अधिक उत्पन्न हवं असेल, तर १५ लाख जमा केल्यास त्यांना दरमहा अंदाजे ₹९,२५० मिळतील, जे एक मजबूत अतिरिक्त उत्पन्न बनू शकते. याचप्रमाणे, जर तुम्ही ₹९ लाख जमा केले, तर तुमचे मासिक उत्पन्न ₹५,५५० पर्यंत पोहोचतं.

खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे बचत खाते नसेल, तर आधी ते उघडावं लागतं. यानंतर एक साधा फॉर्म भरून MIS खातं उघडलं जाऊ शकतं.

वास्तविक पोस्ट ऑफिस पूर्णपणे भारत सरकारच्या अंतर्गत येते, त्यामुळे यात गुंतवलेली तुमची रक्कम १००% सुरक्षित राहते. MIS सारखी स्कीम अशा लोकांसाठी योग्य आहे, ज्यांना कोणत्याही जोखीमेशिवाय निश्चित उत्पन्न हवं आहे. ही योजना लहान गुंतवणूकदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कोणत्याही तणावाशिवाय त्यांच्या दर महिन्याच्या खर्चाचं व्यवस्थापन करण्यात चांगली मदत करते.

त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नाच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिस MIS तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. एकदा गुंतवणूक करा आणि ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला निश्चित रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. थेट बँक खात्यात, कोणत्याही जोखमीशिवाय आणि कोणत्याही अडचणीशिवाय याचा लाभ मिळतो.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)