SBI च्या 'या' खात्यावर करा कमाई, खाते उघडल्यानंतर होईल 1350 रुपयांचा फायदा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 04:32 PM2021-03-07T16:32:17+5:302021-03-07T16:49:41+5:30

State Bank of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही चांगला कमाई करण्याचा प्लॅक करत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (एसबीआय) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे.

कोरोना संकट काळात रोजगाराचा मोठा प्रश्न बनला असताना देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय 44 कोटीहून अधिक ग्राहकांना पैसे कमविण्याची संधी देत ​​आहे.

एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी खास खाते उघडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे तुम्ही पैसा कमवू शकता. तसेच, हे खाते तुम्ही उघडल्यास 1350 रुपये वाचवू शकता.

दरम्यान, बँक आपल्या योनो अॅपवर डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याची सुविधा ग्राहकांना देत आहे. एसबीआयकडे हे खाते उघडल्यास आपण 1350 रुपये वाचवू शकता. याबद्दल माहिती जाणून घ्या....

एसबीआयने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एसबीआय ग्राहक आता योनो अॅपच्या माध्यमातून डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडू शकतात. योनो अॅपद्वारे खाते उघडा आणि वाचवा 1350 रुपये. यामध्ये तुम्हाला 850 रुपयांचे खाते मोफत उघडण्याची संधी मिळत आहे. याशिवाय, पहिल्या वर्षासाठी 500 रुपयांचे मोफत DP AMC मिळेल.

या खात्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.sbiyono.sbi/index.html या लिंक वर क्विक करा. त्यानंतर तुम्हाला यासंदर्भातील सर्व माहिती मिळून जाईल.

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते बँक खात्यासारखेच आहे. यात फरक फक्त इतका आहे की बँक खात्यात पैशांचा व्यवहार केले जातो, तर डिमॅट खात्यात समभागांची खरेदी-विक्री केली जाते.

ज्याप्रमाणे बँकांमध्ये पैसे सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे डिमॅट खात्यातील समभाग सुरक्षित असतात. त्यामुळे याबाबत चिंतेचे कुठलेच कारण नाही. ऑनलाईन समभागात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. तुम्ही एसबीआय, एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट, अ‍ॅक्सिस डायरेक्ट अशा कोणत्याही ब्रोकरेजकडे उघडू शकता.

डीमॅट खात्यामध्ये शेअर म्हणजेच समभागांव्यतिरिक्त म्युच्युअल फंड युनिट्स, डिबेंचर, बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीजदेखील ठेवता येतात. एसबीआयच्या मते, सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूकीपूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

प्रथम तुमच्या मोबाईल फोनवर एसबीआयचा योनो (योनो) अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर योनो अ‍ॅपवर लॉग इन करा. मग, गुंतवणुकीच्या पर्यायावर जा. यानंतर याठिकाणी येथे ओपन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटच्या पर्यायावर क्लिक करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.