मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:17 PM2021-09-21T12:17:54+5:302021-09-21T12:32:07+5:30

Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani : एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आता रंजक बाब म्हणजे तिन्ही मातब्बर मिळून एकच प्रोजेक्ट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. पीएलआय स्कीमनुसार जवळपास 40 गीगा वॉटच्या सोलर मॉड्यूलसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये टाटा, रिलायन्स आणि अदानी ग्रुप हे तिघेही बोली लावण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी एकूण 18 कंपन्यांनी रुची दाखविली आहे. यामध्ये अन्य मोठ्या कंपन्यादेखील आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा पॉवर, अदानी सोलार, एक्मे सोलार, विक्रम सोलार यांनी सोलार मॉड्युलच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेटिव्ह (पीएलआय) योजनेनुसार कंत्राट मिळविण्यासाठी बोली लावू शकतात.

सरकारला या 40 गीगा वॉटच्या प्रकल्पाला कंपन्यांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळण्याची अपेक्षा आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार या प्रकल्पात मोठ्या कंपन्या रुची दाखवत आहेत. सुरुवातीपासून अखेरपर्यंत सोलर मॅन्युफॅक्टरिंगसाठी प्रतिबद्ध असतील.

रविवारपर्यंत जवळपास या प्रकल्पासाठी 18 निविदा आल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आज या निविदा उघडल्या जाणार आहेत. हे टेंडर टाटा, रिलायन्स किंवा अन्य कोणाला मिळते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

अधिकाऱ्यानुसार अधिकाधिक 10 गीगा वॉटचा वाटा मिळेल. अनेक कंपन्या या वेफर्स ते मॉड्युल पर्यंत तसेच पॉलीसिलिकॉन ते मॉड्युलपर्यंत इंटिग्रेटेड प्लांट तयार करू शकतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिलमध्ये 4500 कोटी रुपयांच्या खर्चासह सौर फोटोवोल्टिक मॉड्युलच्या निर्माणासाठी पीएलआय योजनेला मंजुरी दिली होती. याद्वारे 17200 कोटींची थेट गुंतवणूक आणण्याची योजना सरकारने बनविली आहे.