सर्वात स्वस्त Home Loan! SBI नंतर 'ही' बँक देतेय सर्वात कमी दरात गृहकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 10:48 AM2021-03-02T10:48:24+5:302021-03-02T10:59:28+5:30

पाहा किती असेल व्याजदर आणि कसं मिळेल कर्ज

प्रत्येकालाच आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा असते. जर तुम्ही आता घर खरेदीसाठी कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

भारतीय स्टेट बँकेनंतर आणखी एका बँकेनं आपल्या गृहकर्जाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा या बँकेनं १ मार्चपासून आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात १० बेसिस पॉईँट्सची कपात केली. या कपातीनंतर कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर ६.६५ टक्क्यांवर आला आहे.

दरम्यान, गृहकर्जाच्या बाजारात कोटक महिंद्रा ही सर्वात कमी दरात गृहकर्ज उपलब्ध करून देत असल्याचा दावा बँकेकडू करण्यात आला आहे. बँकेची ही ऑफर ३१ मार्चपर्यंत लागू असेल.

बँकेची ही ऑफर सर्वच लोन अकाऊंटवर लागू आहे. गृहकर्जाचे हे दर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यू रेश्योवर अवलंबून असतील.

हे दर गृहकर्ज आणि बॅलन्स ट्रान्सफरवर लागू होती. नोकरी आणि सेल्फ एम्प्लॉईड दोन्ही जण या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

कर्ज घेण्यासाठी ग्राहकांना Kotak Digi Home Loans द्वारे अर्ज करावा लागेल. तसंच यासाठी प्रोसेसिंग टाईमही कमी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोटक महिंद्रा बँकेुसार सध्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असून ही घर खरेदीसाठी उत्तम वेळ असल्याचंही सांगण्यात आलं.

कोटक महिंद्रा बँकेनं होम लोन मार्केटमध्ये प्राईस लीडर म्हणून आपली स्थिती सध्या उत्तम केली आहे.

याव्यतिरिक्त आपण आपल्या ग्राहकांना एक विशेष इयर एन्ड बोनस देण्याचा निर्णय घेता आहे, असं बँकेनं नमूद केलं. तसंच हे नवे दर सॅलराईड आणि सेल्फ एम्प्लॉईड ग्राहकांसाठी लागू असणार असल्याचंही बँकेनं म्हटलं.

यापूर्वी भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं आपल्या एका विशेष ऑफर अंतर्गत आपल्या ग्राहकांना गृहकर्जाच्या व्याजदरात ७० बेसिस पॉईंट्सची सूट देण्याचा निर्णय़ घेतला होता.

या अंतर्गत व्याजदर हे ६.७० टक्क्यांपासून सुरू होती. तसंच हा व्याजदर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर होता.

स्टेट बँक ग्राहकांच्या सिबिल स्कोअर आणि कर्जाच्या रकमेवर हा दर निश्चित करणार आहे. तसंच स्टेट बँकेनं ३१ मार्चपर्यंत कर्ज घेणाऱ्यांसाठी प्रोसेसिंग फीदेखील माफ केली आहे.

ज्यांची कर्जाची रिपेमेंट हिस्ट्री उत्तम आहे त्यांना या ऑफरचा फायदा मिळणार असल्याचंही बंकेनं म्हटलं होतं.

ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोअर उत्तम आहे त्यांना गृहकर्जाच्या व्याजदरावर ७० बेसिस पॉईंट्सची सूट मिळणार आहे.

अशातच ग्राहकांना ७५ लाख रूपयांपर्यंतचं कर्ज घेतल्यास त्यावर ६.७० टक्क्ये व्याजदर आकारलं जाईल.

तर ७५ लाखांपासून ५ कोटींपर्यंतच्या कर्जावर ६,.७५ टक्के व्याजदर आकारलं जाईल.

जर महिलांना कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना यावर अतिरिक्त ०.५ टक्क्यांची सूट मिळेल.

अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी महिलांना डिजिटली YONO अॅपवरून कर्जासाठी अर्ज करावा लागणार आहे.

या ऑफर अंतर्गत ३१ मार्च पर्यंत गृहकर्जावर प्रोसेसिंग फी वर १०० टक्के सूट मिळणार आहे.