२०० रूपये स्वस्तात मिळणार Jio ६६६ Prepaid Plan, केवळ 'असं' करावं लागेल रिचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:56 PM2022-07-31T12:56:50+5:302022-07-31T12:59:40+5:30

Jio 666 Prepaid Plan ची वैधता 84 दिवसांची असते. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो.

सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तसंच आपल्याकडे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत असतात. सध्या रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना अनेक आकर्षक प्लॅन्स ऑफर करत आहे.

रिलायन्स जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनची सर्वाधिक विक्री होते. यामागे अनेक कारणं आहेत. परंतु हा प्लॅन तुम्हाला 200 रूपये स्वस्तात कसा विकत घेता येईल हे आपण पाहुया.

Jio 666 Prepaid Plan मध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता देण्यात येते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. तसंच दररोज 100 एसएमएसचाही लाभ देण्यात येतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचा अॅक्सेसही देण्यात येतो.

Amazon Pay Jio रिचार्जवर उत्तम ऑफर देत आहे. जर एखाद्या नवीन युझरने Amazon Pay च्या माध्यामातून हे रिचार्ज केले तर त्याला 200 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, जर एखाद्या नवीन ग्राहकाने Jio रिचार्ज केला तर त्याला 25 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

मात्र यासाठी कंपनीनं काही अटी घातल्या आहेत. त्या अंतर्गत रिचार्ज केल्यानंतर बक्षीसाच्या रुपात ही रक्कम देण्यात येईल. यासाठी तुम्हाला रिचार्ज करण्यापूर्वी याबाबत माहिती घेणं आवश्यक आहे.

रिलायन्स जिओ व्यतिरिक्त एअरटेलदेखील 666 रूपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. यात ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यात ७७ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय यात दररोज 100 एसएमएस आणि Prime Video Mobile Edition चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. या प्लॅनमध्ये जिओच्या तुलनेत वैधता कमी मिळत असली तरी अन्य फायदे तुलनेने अधिक आहेत.