शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:28 IST2025-11-18T10:12:24+5:302025-11-18T10:28:32+5:30
Multibagger Stocks: २०२५ मध्ये शेअर बाजारात चढउतार दिसत असला तरी परंतु या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना आधीच श्रीमंत बनवलं आहे. या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वेगानं वाढले आहेत.

Multibagger Stocks: २०२५ मध्ये शेअर बाजारात चढउतार दिसत असला तरी परंतु या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना आधीच श्रीमंत बनवलं आहे. या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वेगानं वाढले आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी एक जॅकपॉट ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा चार मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत.

२०२५ मध्ये आरआरपी सेमीकंडक्टर, मिडवेस्ट गोल्ड लिमिटेड, एलिटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड आणि जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड सारख्या स्टॉकनी प्रभावी परतावा दिला आहे. या स्टॉकनी १६००% ते ६१२६% पर्यंत परतावा दिलाय.

२०२५ मध्ये सेमीकंडक्टर कंपनी असलेल्या आरआरपी सेमीकंडक्टरच्या स्टॉकनं सर्वात मोठी धमाका केलाय. १ जानेवारी २०२५ रोजी या मल्टी-बॅगर स्टॉकची किंमत ₹१८५.५० होती आणि आता ती वाढून ₹११,५४९ झाली आहे. एकूणच, या स्टॉकने २०२५ मध्ये अंदाजे ६,१२६% परतावा दिलाय.

गोल्ड अँड नॅचरल स्टोन व्यवसायात गुंतलेली मिडवेस्ट गोल्ड लिमिटेड ही कंपनी या वर्षी मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये समाविष्ट आहे. २०२५ च्या मल्टीबॅगर यादीत त्याचा समावेश आहे. त्याच्या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना २८२९% परतावा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याची किंमत ₹११७.१० होती, ती ₹३४३० वर पोहोचली आहे.

या वर्षी एलीटकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्येही जोरदार तेजी दिसून आली आहे. जानेवारीमध्ये ₹१०.३७ असलेली शेअरची किंमत आता ₹१२२ वर पोहोचली आहे. २०२५ साठी या शेअरचा परतावा अंदाजे १०७५% आहे. अलीकडेच, कंपनीने तिचा एफएमसीजी व्यवसाय वाढवण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक केली. तिने लँड्समिल अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५५% आणि सनब्रिज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५१.६५% हिस्सा विकत घेतला.

एलिटकॉन इंटरनॅशनलने एफएमसीजी क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी लँड्समिल अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड आणि सनब्रिज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली. गेल्या सहा महिन्यांत या मल्टीबॅगर स्टॉक्सने ३४७% परतावा दिला आहे. तथापि, एका महिन्यात त्यांची किंमत २३% घसरली आहे.

जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांसाठी सोन्याची खाण ठरला आहे. २०२५ मध्ये त्याचा स्टॉक १८.१९ वरून ३२२ ₹ वर पोहोचला आहे, जो १,६७१% परतावा दर्शवतो. गेल्या पाच वर्षांत, या स्टॉकमध्ये ७,०००% वाढ झाली आहे. फक्त सहा महिन्यांत, त्याने १८८% परतावा दिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
















