Investment Tips: छप्परफाड पैसा कामवायचा आहे? तर ही असू शकते गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित अन् चांगली जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:13 PM2023-01-02T12:13:35+5:302023-01-02T12:26:32+5:30

आपलीही अशाच पद्धतीने गुंतवणूक करायची इच्छा असेल, तर आपण ती कुठे करू शकतात हे जाणणेही आवश्यक आहे. जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावाही मिळू शकेल.

जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल, जी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम करत नसेल आणि बचत करत नसेल. लोक जे काही कमावतात ते त्यांचा आजचा खर्च तर भागवतातच, शिवाय उद्याची तजवीजही करून ठेवतात. फक्त ही बचत वेगवेगळ्या पद्धतीने किली जाते.

कुणी आपल्या पैशांची बचत करतात, तर कुणी ते अशा ठिकाणी गुंतवतात, जेथून भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल. आपलीही अशाच पद्धतीने गुंतवणूक करायची इच्छा असेल, तर आपण ती कुठे करू शकतात हे जाणणेही आवश्यक आहे. जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावाही मिळू शकेल.

सोन्यात करू शकता गुंतवणूक - जर चांगला परतावा मिळावा यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची असेल, तर आपण सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोन्याचे भाव सातत्याने वाढत असतात. यामुळे सोने भविष्यात चांगला लाभ देऊ शकते. एवढेच नाही, तर सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षितही समजले जाते. कारण यात परतावा बुडण्याची भीती जवळपास नसतेच.

शेअर बाजार जसजसा घसरतो, तस-तसा सोन्याचा भाव वधारतो, हे आपण समजून घ्यायला हवे. यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. यामुळे, आपली इच्छा असल्यास आपण सोन्यात गुंतवणूक करू शकता, जेणेकरून आपल्याला चांगला परतावा मिळू शकेल.

असा मिळू शकतो चांगला परतावा - जर सोन्यात गुंतवणूक करून आपल्याला चांगला परतावा मिळवायचा असेल, तर आपण गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंडात गुंतवणूक करू शकता. या पद्धतीने आपण आपले सोने सुरक्षित करू शकता.

याच बरोबर, जर आपण ज्वेलरी बनवली तरीही आपल्या सोन्यात कपात होत नाही. येथे हेही समजून घेणे आवश्यक आहे की, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हे सोने खरेदी करण्यासारखेच आहे. तर दुसरीकडे, गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे थेट खाण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आहे. यामुळे बाजारातील चढ-उतारापासूनही आपले सोने सुरक्षित राहते.