फॅशन का जलवा! डायमंड नेकलेस, क्लासी ब्लॅक ड्रेस; 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा 'किलर' लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:24 PM2024-05-23T13:24:24+5:302024-05-23T13:37:00+5:30

Priyanka Chopra in Hot Black Look: प्रियांका चोप्राच्या नव्या लूकमधला फोटोशूट पाहिलात का?

Priyanka Chopra in Hot Black Look: बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा जोनास तिच्या स्टाईलने आणि फॅशनने चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते. तिच्या फॅशनचा 'जलवा' साऱ्यांनाच आश्चर्यचकित करतो. त्यातच प्रियांकाने आता पुन्हा एकदा फॅन्सना घायाळ केले आहे.

प्रियांकाने बुल्गारी इव्हेंटमधील तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. प्रियांका चोप्राने बुल्गारी इव्हेंटसाठी काळ्या रंगाचा ग्लॉसी ड्रेस निवडला. स्लीव्हलेस ट्यूब स्टाइल ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसली.

प्रियांकाचा हा लांब आणि बॉडीहॅगिंग ड्रेस साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. या ड्रेसमधून प्रियांकाची अप्रतिम फिगर देखील फ्लाँट होत होती. काळ्या बॉडी हँगिंग ड्रेससोबत तिने साइड पार्टीशनसह तिचे केस खुले सोडले होते.

प्रियांकाने हलकी कर्ली हेअरस्टाईल सेट केली होती. या आउटफिटसह, प्रियांका चोप्राने सिल्व्हर नेकलाइन निवडली, त्यात निळ्या रंगाचा स्टोन अधिकच उठून दिसत होता. त्याचबरोबर प्रियांकाने मॅचिंग रंगाच्या स्टोनची अंगठीही घातली होती.

प्रियांका चोप्राने ग्लॅम मेकअप आणि स्मोकी आयलाईन सह तिचा लूक पूर्ण केला. हे फोटो पाहून नक्कीच म्हणता येईल की प्रियांकाचे सौंदर्य वाखाणण्याजोगे आहे. या नव्या लूकमध्ये तिने ठिकठिकाणी दिलेल्या अप्रतिम पोजमुळे तिची सुंदरता आणखी वाढली.

प्रियांका चोप्रा नुकतीच 'लव्ह अगेन' या रोमँटिक ड्रामामध्ये दिसली. यात तिच्यासोबत सॅम ह्यूगन आणि सेलिन डिऑन होते. प्रियांकाचा आगामी चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट' हा ॲक्शन-कॉमेडी आहे. त्यात इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्याही भूमिका आहेत. तसेच प्रियांका फ्रँक ई फ्लॉवर्सच्या 'द ब्लफ' या चित्रपटातही झळकणार आहे.