“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:42 AM2024-05-24T11:42:10+5:302024-05-24T11:48:38+5:30

Fact Check: मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो एडिटेड असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे.

fact check of mallikarjun kharge viral video claiming of congress party will ends is false | “काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

Claim Review : काँग्रेस आता संपुष्टात येणार, असे विधान मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: Fact Crescendo
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी, २५ मे रोजी होणार आहे. त्यानंतर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ०४ जून रोजी होणार आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. अशातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काँग्रेस संपली, काँग्रेस आता कुठे दिसणार नाही, असे खरगे म्हणताना दिसत आहेत. 

या व्हायरल व्हिडिओला अनुसरून दावा केला जात आहे की, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस संपुष्टात येण्याबाबत वक्तव्य केले आहे. काही युजर्सनी या व्हिडिओचे फॅक्ट-चेक करण्याबाबत विचारणा केली. या व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीअंती असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे आणि मल्लिकार्जुन खरगे भाजपावर टीका करत होते.

व्हायरल व्हिडिओतील दावा काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे एका सभेतील भाषणादरम्यान सांगतात की, “काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही”. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसचे अंतिम संस्कार निश्चित केले आहे”.

मूळ पोस्ट: फेसबुक | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, मल्लिकार्जुन खरगेंनी ३ मे रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरात केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. काँग्रसच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

या भाषणात मल्लिकार्जुन खरगे १२.०३ मिनिटापासून पुढे म्हणतात की, “अहमदाबाद हे एक प्रसिद्ध शहर आहे. या भूमीवर महात्मा गांधीजी, सरदार पटेलजी आणि इतर महान नेत्यांचाही जन्म झाला आणि त्यांनी गुजरातला महान बनवले. गांधीजी, सरदार पटेल, मुराभाई देशाई, बिठ्ठलभाई पटेल आणि सर्व महान नेत्यांनी देशाची उभारणी केली. त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचे तीन अध्यक्ष झाले, ज्यामध्ये सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जी.यू.एन देबर होते. या सगळ्यांनी पक्ष मजबूत केला.”

विचारांना संपवण्याचे विचार भाजपामध्ये केला जातो

मल्लिकार्जुन खरगे पुढे सांगतात की, “काँग्रेसचा पाया अहमदाबाद शहरात खूप मजबूत आहे. जो कोणी नष्ट करून शकत नाही आणि कोणीही पक्षाला संपण्याची हिम्मत करू शकत नाही. येथील काही नेता बोलतात की, ‘काँग्रेस संपली, काँग्रेसचा अंत झाला आणि आता तुम्हाला काँग्रेस कुठेही दिसणार नाही.’ अहमदाबाद हे शहर गांधींचे पवित्र शहर आहे. परंतु, अश्चर्याची गोष्ट आहे की, या भूमीवर अशा ही विचारधारेचे लोक जन्माला आली आहेत, जे गांधींची विचारधारा संपवू इच्छितात. या भूमीवर गांधींनी स्वातंत्र्यासाठी आपल सर्वस्व दिल, त्यांच्याच विचारांना संपवण्याचे विचार भाजपमध्ये केला जातो.”

सदरील वक्तव्य येथे पाहू शकता. तसेच काँग्रसच्या अधिकृत वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण लिखित स्वरूप उपलब्ध आहे. तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचा अंत पाहू इच्छिणाऱ्या लोकांवर आणि भाजपावर टीका करत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(सदर फॅक्ट चेक Fact Crescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check of mallikarjun kharge viral video claiming of congress party will ends is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.