Lokmat Money >शेअर बाजार > Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:55 AM2024-05-24T11:55:43+5:302024-05-24T11:57:38+5:30

Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली.

Hariom Atta Listing Retail Investors Share 2556 Times over subscribed Now Listing at 206 percent Premium Investor huge problem | Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली. आयपीओ अंतर्गत ४८ रुपयांना शेअर्स जारी करण्यात आले. आज एनएसई एसएमईवर कामकाजादरम्यान तो १४७ रुपयांवर पोहोचला, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना २०६.२५ टक्के लिस्टिंग नफा (Hariom Listing Gain) मिळाला आहे. मात्र, लिस्टिंगनंतर शेअरमध्ये घसरण झाली. प्रॉफिट बुकिंगमुळे तो १३९.६५ रुपयांच्या (Hariom Share Price) लोअर सर्किटपर्यंत घसरला म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदार आता १९०.९४ टक्के नफ्यात आहेत.
 

IPO ला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद
 

हरिओम आटा अँड स्पाइसेसचा ५.५४ कोटी रुपयांचा आयपीओ १६ ते २१ मे दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो २,०१३.६४ पट ओव्हरसब्सक्राइब झाला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव शेअरपैकी अर्धा हिस्सा २,५५६.४६ पट सबस्क्राईब झाला. या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ११.५५ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा निधी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.
 

कंपनीबाबत माहिती
 

'हरिओम' या ब्रँड नावाने पीठ, राईचं तेल आणि मसाले यासह इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारी हरिओम आटा अँड स्पाइसेस २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यांचं उत्पादन केंद्र गुरुग्राममध्ये आहे. कंपनीचे १० एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स आहेत, त्यापैकी ४ आयएसआयच्या मालकीचे आहेत आणि ६ फ्रेन्चायझीच्या मालकीचे आहेत. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती सातत्यानं मजबूत दिसून येत आहे.
 

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा १२.८५ लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २७.३३ लाख रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५८.७९ लाख रुपये झाला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक २७ टक्क्यांनी सीएजीआरनं वाढून १२.१९ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ बद्दल बोलायचं झालं तर एप्रिल-डिसेंबर २०२३ मध्ये ७४.५० लाख रुपयांचा निव्वळ नफा आणि ११.५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Hariom Atta Listing Retail Investors Share 2556 Times over subscribed Now Listing at 206 percent Premium Investor huge problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.