Share Market Multibagger Stock : गुंतवणूकदार मालामाल! 'या' पेनी स्टॉकनं ३० हजारांचे केले ७ कोटी; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:29 PM2022-04-03T19:29:46+5:302022-04-03T19:32:45+5:30

Share Market Multibagger Stock : या शेअरनं गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांमध्ये केलं कोट्यधीश. अवघे काही हजार झाले कोटी.

Share Market Multibagger Stock : आज आम्‍ही तुम्‍हाला मल्टीबॅगर शेअरबद्दल (Multibagger share) सांगत आहोत, ज्यानं अवघ्या ६ महिन्‍यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. या स्टॉकचं नाव आहे सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड ( Sel Manufacturing Company Ltd).

या कंपनीच्या स्टॉकने गेल्या ६ महिन्यांत २ लाख ४६ हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. कंपनीचे शेअर्समध्ये गेल्या काही सत्रांपासून सातत्याने अपर सर्किट लागत आहे आणि शुक्रवारी NSE वर शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून ८६२.२५ रुपयांवर बंद झाले.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या सहा महिन्यांत NSE वर ३५ पैशांवरून (२७ ऑक्टोबर २०२१ ची बंद किंमत) १ एप्रिल २०२२ रोजी ८६२.२५ रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत, कंपनीच्या शेअर्सनं सुमारे २४६,२५७.१४ टक्के इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

त्याच वेळी, २०२२ मध्ये YTD नुसार, हा शेअर ४४.४० रुपये (३ जानेवारी २०२२ ची किंमत) वरून ८६२.२५ रुपये प्रति शेअर इतका वाढला. या कालावधीत या शेअरनं १,८४२ टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक १६५.१० टक्क्यांनी वाढला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ मार्च रोजी या शेअरची किंमत ३२५.२५ रुपये होती.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये ३५ पैसे दराने ३० हजार रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम ७.३९ कोटी रुपये झाली असती.

तर दुसरीकडे या वर्षी २०२२ मध्ये, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ४४.४० रुपये दराने ३० हजार रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम ५.८२ लाख रुपये झाली असती.