शेअर नाही, पैशांचं झाडं...! 2 रुपयांच्या शेअरनं केलं 'करोडपती', 5 वर्षांत दिला तब्बल 18300% परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:01 IST2025-10-06T16:50:01+5:302025-10-06T17:01:10+5:30
जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या पाच वर्षांपूर्वी या शअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तिचे मूल्य 1.84 कोटी रुपयांवर पोहोचले असते.

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत जबरदस्त तेजी दिसत आहे. अनेक शेअर्स हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहेत. यात काही शेअर असेही आहेत, जे बाजारात चढ-उतार दिसत असतानाही आपल्या गुंतवणूकदारांना जबदस्त परतावा देत आहेत.
यांपैकीच एक म्हणजे, इंडो थाई सिक्युरिटीज लिमिटेड (Indo Thai Securities Ltd) चा शेअर. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ चांगला नफाच दिला असे नाही, तर अेकांना कोट्यधीशह बनवले आहे.
इंडो थाईच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे. सोमवारी दुपारी २ वाजता हा शेअर ३.३१% वाढीसह ३१५.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. दिवसभरात तो ४% ने वाढून ३१७.१५ रुपयांवर पोहोचला आणि त्याने ५२ आठवड्यांचा उच्चांकही गाठला.
दरम्यान, या शेअरला अनेकवेळा ५% चे अपर सर्किटही लागले आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरने १८,३००% पेक्षाही अधिक परतावा दिला आहे.
एका महिन्याचा विचार करता, या शेअरने केवळ एका महिन्यातच आपल्या गुंतवणुकीची रक्कम जवळपास दुप्पट केली आहे. एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत सुमारे 166 रुपये होती, आता तो 315 रुपयांच्याही वर पोहोचला आहे. अर्थात, या शेअरने एका महिन्यात 90 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे.
पाच वर्षांपूर्वी, या शेअरची किंमत केवळ 1.71 रुपये होती. तो आता सुमारे 315 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या पाच वर्षांपूर्वी या शअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तिचे मूल्य 1.84 कोटी रुपयांवर पोहोचले असते. अर्थात या शेअरने गेल्या पाच वर्षांत जवळपास 18350 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)