३१ मार्चपर्यंत आटोपून घ्या ही महत्त्वाची आठ कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:18 AM2021-03-12T10:18:35+5:302021-03-12T10:29:49+5:30

Deal With These 8 Important Tasks Before 31 March : १ एप्रिल म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत काही महत्त्वाची कामे ही आटोपून न घेतल्यास तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

१ एप्रिल म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत काही महत्त्वाची कामे ही आटोपून न घेतल्यास तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये प्राप्तिकरातील सवलतीसह गुंतवणूक आणि आधार-पॅन लिंकसारख्या कामांचाही समावेस आहे. आज आपण जाणून घेऊयात त्या आठ महत्त्वाच्या कामांविषयी जी या ३१ मार्चपर्यंत आटोपून घेणे आवश्यक आहे.

प्राप्तिकरात सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक - Marathi News | प्राप्तिकरात सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक | Latest business Photos at Lokmat.com

जर तुम्ही प्राप्तिकरामध्ये सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला अशी गुंतवणूक ३१ मार्चपर्यंत करावी लागेल. सरकार प्राप्तिकर कायद्यातील ८०सी, ८०डी अशा विविध कलमांनुसार करामध्ये सवलत देते. या कायद्यामधील ८०सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.

आधार-पॅन लिंक - Marathi News | आधार-पॅन लिंक | Latest business Photos at Lokmat.com

पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. प्राप्तिकर विभाग त्यांना लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख वारंवार वाढवत आहे. मात्र आता त्याल मुदतवाढ न मिळाल्यास ३१ मार्चपर्यंत पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करून घ्यावे लागेल. तसे न केल्यास हे पॅनकार्ड डिअॅक्टिव्हेट होईल.

ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे चेकबूक आणि आयएफएससी होतील कालबाह्य - Marathi News | ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे चेकबूक आणि आयएफएससी होतील कालबाह्य | Latest business Photos at Lokmat.com

पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, ओरिएंटल बँक ऑफ कॉर्मस आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेकबूक आणि आयएफएससी, एमआयसीआर कोड हे ३१ मार्चपर्यंतच वैध असतील. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून नवा कोड आणि चेकबूक घ्यावे लागेल. अधिक माहिती 18001802222/18001032222 या क्रमांकावर मिळू शकते. गतवर्षी एप्रिल महिन्यात सरकारने पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे विलिनीकरण केले होते.

स्वस्त गृहकर्जाचा फायदा - Marathi News | स्वस्त गृहकर्जाचा फायदा | Latest business Photos at Lokmat.com

स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी होम लोनवरील व्याजदर खूप कमी केले आहेत. जर तुम्ही कमी व्याजदरांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करावा लागेल. सध्या एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक ६.७० टक्के दराने कर्ज देत आहेत. कोटक महिंद्रा बँक ६.६५ टक्के दराने व्याज देत आहे.

३१ मार्चपर्यंत एफडी केल्यास मिळेल अधिक व्याज - Marathi News | ३१ मार्चपर्यंत एफडी केल्यास मिळेल अधिक व्याज | Latest business Photos at Lokmat.com

एसबीआय, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स डिपॉझिट स्कीम चालू केली आहे. या स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीच्या तुलनेत अधिक व्याज मिळत आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या पालकांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ३१ मार्चपर्यंत या योजनेचा फायदा घेऊ शकता.

पीएम किसान नोंदणी - Marathi News | पीएम किसान नोंदणी | Latest business Photos at Lokmat.com

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जे लोक आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आपली नोंदणी करू शकलेले नाहीत, त्यांनी ३१ मार्चपूर्वी अर्ज केल्या आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला तर होळीनंतर त्यांना दोन हजार रुपये मिळतील.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची ३१ मार्चपर्यंत संधी - Marathi News | किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची ३१ मार्चपर्यंत संधी | Latest business Photos at Lokmat.com

जर तुम्ही शेतकरी असाल आणि आतापर्यंत तुम्ही किसान क्रेडिट कार्ड बनवले नसेल तर तुम्हाला ३१ मार्चपर्यंत हे कार्ड घेता येईल. त्यासाठी सरकारकडून एक मोहीम चालवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना हे कार्ड मिळालेले नाही, ते आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये संपर्क साधून कार्ड बनवून घेऊ शकतात.

विवाद ते विश्वास योजनेंतर्गत माहिती देण्याची शेवटची तारीख - Marathi News | विवाद ते विश्वास योजनेंतर्गत माहिती देण्याची शेवटची तारीख | Latest business Photos at Lokmat.com

प्राप्तिकर विभागाने प्रत्यक्ष कर विवादावर तोडगा काढण्यासाठी विवाद ते विश्वास अंतर्गत माहिती देण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. तसेच या योजनेंतर्गत दंडात्मक रकमेचा भरणा करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दीर्घकाळ लांबलेले करविवाद सोडवणे हा या योजनेचा उद्देश आहे.