Gold-Silver Price Today : खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:50 PM2023-05-25T14:50:19+5:302023-05-25T15:19:40+5:30

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत गेल्या काहीव दिवसापासून घसरण सुरू आहे.

सोन्या- चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारीच्या तुलनेत आज २५ मे २०२३ रोजी सोनं- चांदी स्वस्त झाले आहेत.

गेल्या काही महिन्यापासून सोनं-चांदीचे दर स्थिर होते. पण, आता सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर सध्या ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदी ७० हजार रुपये प्रति कीलो दर आहेत.

राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६०,२२८ रुपये आहे. तर ९९९ शुद्ध चांदीची किंमत ७०,३१२ रुपये आहे.

बुधवारी सायंकाळी २४ कॅरेट शुद्ध सोनं ६०६८० रुपये प्रति १० ग्रॅम होतं. आज सकाळी ६०२२८ रुपयांवर व्यवहार करत आहे. यासह आता चांदीचे दरही घसरले आहेत.

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ५९,९८७ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी ९१६ शुद्धतेचे सोने आज ५५१६९ रुपये झाले आहे.

याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४५१७१ वर आला आहे. दरम्यान, ५८५ शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते ३५,२३३ रुपयांवर आले आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ७०३१२ रुपये झाला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत.

२२ कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.

याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.