सोन्याचा भाव गडगडला! चांदीही झाली स्वस्त, खरेदीदारांसाठी मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:41 IST2025-05-20T13:38:22+5:302025-05-20T13:41:53+5:30

Gold Prices Today: मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,०२० रुपये आहे, जो कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथेही आहे. आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली.

सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. ती सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार तणाव कमी झाल्यामुळे, खरेदीदारांना त्याच्या किमतींमध्ये दिलासा मिळत आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर मंगळवारी त्यात थोडीशी घसरण झाली.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९० रुपयांनी कमी होऊन ९५,०२० रुपये झाला, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१०० रुपयांवर आहे. यात ४५० रुपयांची घसरण झआली. मुंबईत सुरुवातीच्या व्यवहारात चांदीचा भाव १,००० रुपयांनी घसरला आणि तो ९७,००० रुपये प्रति किलोने विकला जात होता.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात घसरण होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याने प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांचा टप्पा गाठला होता.

सोनं आणि चांदीच्या भावात नेहमी चढ-उतार होत असतात. याचे अनेक कारणं असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललंय, अमेरिकेतील डॉलरची किंमत काय आहे, लोक किती प्रमाणात सोनं-चांदी खरेदी करत आहेत, यांसारख्या अनेक गोष्टींवर भाव अवलंबून असतात. त्यामुळे रोजच्या रोज भावात थोडाफार फरक दिसतो.

प्रत्येक शहरात सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात सर्वाधिक महाग सोने जळगावमध्ये मिळतं. सराफा संघटना दरदोज मौल्यवान धातूचा भाव ठरवतात.