Gold Price Today: सोन्याची चमक पुन्हा वाढली! फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:36 AM2023-04-13T11:36:56+5:302023-04-13T11:41:19+5:30

Gold-Silver Price Today: दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Gold-Silver Price Today: दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली होती.

मात्र त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५,००० रुपये आणि चांदी ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चांदी ७६, ००० रुपयांवर पोहोचली आहे.

सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बुधवारी सायंकाळी सोन्याचा भाव ६०६१३ रुपये आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये किलो झाला.

बुधवारी संध्याकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०६१३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये प्रति किलो झाला आहे.

याशिवाय २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५५२२ रुपये, २० कॅरेट सोन्याचा भाव ४५४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,३५० रुपयांवर आहे. मुंबईत आज १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे.

आज कोलकातामध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे. चेन्नईमध्ये आज १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,७६० रुपयांवर आला आहे.

भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक मागणी देखील मौल्यवान धातूंच्या दरामध्ये दिसून येणारा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.