Gautam Adani : जबरदस्त! गौतम अदानी पुन्हा श्रीमंतीच्या यादीत टॉप-10 मध्ये, अंबानी आले या नंबरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 01:12 PM2023-02-01T13:12:08+5:302023-02-01T13:17:05+5:30

भारतातील प्रसिद्ध उद्योग समुह अदानी समुह. अदानी समुहाविरोधात गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

भारतातील प्रसिद्ध उद्योग समुह अदानी समुह. अदानी समुहाविरोधात गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे या समुहाचे शेअर घसरले आहे, यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. जगभरातील श्रीमंताच्या यादीतून टॉप-10 मधून ते बाहेर पडले होते, आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

देशातील क्रमांक दोनचे श्रीमंत गौतम अदानी यांना गेल्या आठवड्यात व्यवसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे त्यांना अचानक 11 व्या क्रमांकावर जावे लागले होते.

आज आलेल्या श्रीमंतांच्या यादीत पुन्हा त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. त्यांच्या संपत्त वाढ झाली आहे. आता पुन्हा पहिल्या दहामध्ये त्याची गणना झाली आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचाही नावाचा समावेश झाला आहे.

आज दोन भारतीयांचा या यादीत समावेश झाला आहे. आज देशात अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने घसरत होता, जो आज वर चढताना दिसत आहे. आता जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश झाला आहे.

श्रीमंतांच्या या यादीत उद्योगपती गौतम अदानी 9व्या तर मुकेश अंबानी 10व्या क्रमांकावर आहेत. जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत आता दोन भारतीयांचा समावेश झाला आहे.

आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 5 अब्जांचा फरक आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 84.9 अब्ज आहे तर मुकेश अंबानींची संपत्ती 84.4 अब्ज आहे. तर पहिल्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब 214 अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

गेल्या आठवड्यापूर्वी अमेरिकेतील फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात तो अदानीच्या कंपन्यांमध्ये शॉर्ट पोझिशनवर असल्याचे म्हटले आहे.

या अहवालात अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या अदानी समूहाच्या कर्जावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 'अदानी समूहाच्या 7 मोठ्या लिस्ट केलेल्या कंपन्यांचे मूल्य 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असा अहवालात दावा करण्यात आला आहे. 'अदानी समूहाला 88 प्रश्न विचारण्यात आले आहेत. या अहवालामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र, अदानी समुहाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या काल आलेल्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर होते. त्यांची एकूण संपत्ती 82.2 अब्ज डॉलर होती.

कालच्या यादीत दोन्ही भारतीय उद्योगपतींच्या निव्वळ संपत्तीतील फरक किरकोळ राहिला होता. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत काल 2.2 अब्ज डॉलर्सचे अंतर होते. गेल्या वर्षी 2022 मध्ये गौतम अदानी जगातील सर्व श्रीमंत लोकांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती म्हणून समोर आले होते.

उद्योगपती गौतम अदानी गेल्या वर्षी 2022 मध्ये श्रीमंताच्या यादीमुळे चांगलेच चर्चेत होते. या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्वाधिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत अदानी समूहाच्या अध्यक्षांचे नाव आघाडीवर आहे. एका महिन्यातच त्यांचे 36.1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.