EPFO Interest Rate CBT: पुढील महिन्यात मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; 24 कोटी लोकांना फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 06:01 PM2022-02-13T18:01:44+5:302022-02-13T18:09:11+5:30

EPFO Interest Rate CBT:

नोकरदार आणि निवृत्तांसाठी पुढील महिना खूप महत्वाचा असणार आहे. मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जवळपास २४ कोटी ईपीएफओ खातेधारकांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी कर्मचारी भविष्य निधीमध्ये जमा रकमेवरील व्याजदर ठरविला जाणार आहे.

गेल्या वर्षी कोरोना होता तरी देखील मोदी सरकारने साडे आठ टक्के व्याजदर ठरविला होता. हे वर्ष त्याहूनही चांगले गेले आहे. यामुळे ईपीएफओ धारकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.

ईपीएफओचे निर्णय घेणारे सीबीटी बोर्डाची बैठक मार्चमध्ये होणारआहे. यामध्ये सध्या सुरु असलेल्या आर्थिक वर्षातील व्याजदराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पीटीआयनुसार केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, सीबीटीची बैठक गुवाहाटी येथे होणार आहे. यामध्ये व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.

ईपीएफओने 2021-22 मध्ये 2020-21 सारखाच 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवला होता. यावर त्यांना विचारले असता त्यांनी हा निर्णय पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या अंदाजावर घेण्यात येणार आहे. भूपेंद्र यादव सीबीटीचे प्रमुख आहेत.

मार्च- 2021 मध्ये, CBT ने 2020-21 साठी EPF ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर जाहीर केला होता. ऑक्टोबर-2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी याला मान्यता दिली. त्यानंतर EPFO ​​ने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना 2020-21 साठी ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्याचे निर्देश दिले होते.

CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जातो. मार्च-2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला. 2018-19 मध्ये EPFO ​​वर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.

EPFO ने 2016-17 आणि 2017-18 मध्ये देखील 8.65 टक्के व्याज दिले होते. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्के होता. त्याचवेळी 2013-14 मध्ये 8.75 टक्के आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते. मात्र, 2012-13 मध्ये 8.5 टक्के व्याजदर होता. 2011-12 मध्ये तो 8.25 टक्के होता.