शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होळीच्या आधी सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला होईल 30 हजार रुपयांचा फायदा; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 2:08 PM

1 / 8
नवी दिल्ली : होळीच्या (Holi 2021) सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. होळीच्या सणानिमित्त प्रत्येकजण आपल्या घरात पापड आणि चिप्स अशा अनेक वस्तू तयार करत असतो.
2 / 8
अशावेळी तुम्ही पापड व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता. होळीच्या काळात तुम्ही या व्यवसायाद्वारे बंपर नफा मिळवू शकता. यासाठी 10 हजार ते 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता.
3 / 8
पापड बनवण्याचा व्यवसाय (Papad Making Business) फक्त 2 लाख रुपयांमध्ये करता येतो. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (National Small Industries Corporation, NSIC) यासाठी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून या माध्यमातून तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दराने मिळणार आहे.
4 / 8
या रिपोटनुसार, एकूण सहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 30 हजार किलो उत्पादन क्षमता (प्रोडक्शन कॅपॅसिटी) निर्माण होईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 6.05 लाखांचा खर्च येईल. एकूण खर्चामध्ये निश्चित भांडवल आणि कार्यरत भांडवलाचा समावेश आहे.
5 / 8
पापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी किमान 250 चौरस फूट जागेची गरज असते. जर तुमच्याकडे इतकी जागा नसल्यास तुम्ही भाड्यानेही जमीन घेऊ शकता.
6 / 8
पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलेन्स, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हन, मार्बल टेबल टॉप, चकला सिलेंडर, अ‍ॅल्युमिनियमची भांडी आणि रॅक यासारख्या मशीनची आवश्यकता लागेल.
7 / 8
एकदा उत्पादन (प्रोडक्ट?) तयार झाल्यावर ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी विकू शकता. ऑफलाइन तुम्ही हे घाऊक विक्रेता आणि किरकोळ व्यापाराला विकू शकता. या व्यतिरिक्त आपण सुपरमार्केट आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधू शकता.
8 / 8
अंदाजानुसार, या व्यवसायामध्ये गुंतवणुकीच्या जवळपास 20 टक्क्यांपर्यंत कमाई होऊ शकते. म्हणजेच 1 लाख गुंतवणुकीवर तुम्ही दरमहा सुमारे 20 ते 30 हजार मिळवू शकता.
टॅग्स :businessव्यवसाय