४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:44 IST2025-10-05T11:36:04+5:302025-10-05T11:44:39+5:30
Credit Card History : आजच्या काळात खरेदी करण्यासाठी किंवा महिन्याच्या अखेरीस आर्थिक मदत म्हणून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. क्रेडिट कार्डने अनेक नोकरदार लोकांचे आयुष्य सोपे केले आहे.

भारतात क्रेडिट कार्डचा प्रवास १९८० मध्ये सुरू झाला. त्यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने पहिले क्रेडिट कार्ड जारी करून या पेमेंट सिस्टीमची सुरुवात केली.
सेंट्रल बँकेने जारी केलेल्या पहिल्या कार्डचे नाव 'सेंट्रल कार्ड' असे होते. हे कार्ड व्हिसा (VISA) नेटवर्कच्या अंतर्गत बाजारात आले होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज भारतात ११ कोटींहून अधिक सक्रिय क्रेडिट कार्ड्स वापरात आहेत.
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर अनेक जागतिक बँकांनी भारतात प्रवेश केला. यामुळे कार्डमध्ये रिवॉर्ड पॉईंट्स, विमा आणि फ्रॉड झिरो लायबिलिटी यांसारख्या सुविधा आल्या.
२००० ते २०१० या दशकात इंटरनेट क्रांतीमुळे ऑनलाइन शॉपिंग वाढली. IRCTC, Flipkart आणि MakeMyTrip सारख्या कंपन्यांमुळे कार्ड पेमेंट रोजचा व्यवहार बनले.
२०१० नंतर NPCI ने RuPay (२०१२) कार्ड्स बाजारात आणले. यामुळे टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये आणि छोट्या बँकांमध्ये कार्ड्सची पोहोच वाढली.
सध्या बाजारात ग्राहकांच्या गरजेनुसार रेग्युलर, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फ्यूएल कार्ड आणि UPI लिंक केलेले डिजिटल कार्ड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पूर्वी क्रेडिट कार्ड केवळ मोठ्या बँका आणि उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी होते. आता AU किंवा Suryoday सारख्या लघु वित्त बँका देखील कार्ड जारी करत आहेत.
क्रेडिट कार्ड आता केवळ मोठ्या शहरांतील लोकांचे उत्पादन राहिलेले नाही. ते आता प्रत्येक सेगमेंटमध्ये उपलब्ध असून ग्राहकांचे प्रोफाइल पूर्वीपेक्षा खूपच विस्तृत झाले आहे.