शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० हजार Charging Stations सुरू करणार ही कंपनी; तुम्हीदेखील करू शकता मोठी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 2:38 PM

1 / 9
देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ (Sales of Electric Vehicles In India) झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे लोक आता इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत आहेत.
2 / 9
तसेच, सरकार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारांकडून ग्राहकांना मोठी सूटही देण्यात येत आहे. ऑटो कंपन्यांनी आता इलेक्ट्रीक वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि नवीन EV मॉडेल सादर करत आहेत. अशा परिस्थितीत आता चार्जिंग स्टेशन उघडून कमाई करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे.
3 / 9
इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणारी कंपनी इव्हीआरईनं (EVRE ने स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स ब्रँड पार्क प्लस (पार्क+) सोबत करार केला आहे. ही कंपनी पुढील दोन वर्षांत देशभरात १० हजार चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
4 / 9
या दीर्घकालीन भागीदारीमध्ये मालवाहतूक करणारी वाहने आणि इतर वाहनांसाठी स्मार्ट चार्जिंग आणि पार्किंग केंद्रे उभारण्यासाठी जागा सुरक्षित करण्यासाठी सहयोग समाविष्ट आहे. EVRE ने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी कराराच्या अंतर्गत EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेची रचना, बांधकाम, स्थापना, ऑपरेशन आणि देखभाल करेल, तर पार्क+ रिअल इस्टेट पैलूची व्यवस्था आणि व्यवस्थापन करेल.
5 / 9
देशात इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी सरकारने एक नवीन योजना बनवली आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) ही योजना पुढे नेण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणादरम्यान, तुम्हाला चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच काम करण्याचे नवीन तंत्रज्ञानही शिकवले जाईल.
6 / 9
प्रशिक्षणामध्ये तुम्हाला यंत्रणा, सौर शक्तीवर चालणारे इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, व्यवसाय, सौर पीव्ही चार्जिंग कनेक्टिव्हिटी लोड, वीज दर इत्यादींची माहिती दिली जाते. या प्रशिक्षणात तुम्हाला या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली जाईल. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडून चांगले पैसे कमवू शकता.
7 / 9
NITI आयोगाने इलेक्ट्रीक वाहनांसाठी (EVs) चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी धोरणे आणि निकष मांडण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांना एक नवीन हँडबुक जारी केले आहे. हे हँडबुक इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी NITI आयोग, ऊर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
8 / 9
या दशकाच्या अखेरपर्यंत व्यावसायिक गाड्यांपैकी ७० टक्के. ३० टक्के खासगी गाड्या आणि ४० टक्के बस तसंच ८० टक्के दुचारी व तीन चाकी इलेक्ट्रीक वाहनं तयार करण्याचं भारताचं ध्येय आहे.
9 / 9
अनेक कंपन्या ईव्ही चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी फ्रँचायझी देतील. या कंपन्यांकडून फ्रँचायझी घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडू शकता. एका अंदाजानुसार, इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी सुमारे ४ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारIndiaभारतbusinessव्यवसायMONEYपैसा