शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती

By रवींद्र देशमुख | Updated: April 29, 2024 15:06 IST

Narendra Modi And Maharashtra lok sabha election 2024 : भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

सोलापूर: आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला मंजूर नाही, पण काँग्रेस मतांसाठी देशात भ्रम निर्माण करीत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात आम्ही आरक्षणाला धक्का लावला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मोदी म्हणाले, काँग्रेसपासून दलित,ओबीसी आणि आदिवासी दूर केले गेले आहेत. त्यामुळे आज मतांसाठी काँग्रेस आम्ही आरक्षण रद्द करणार असल्याचा भ्रम निर्माण करीत आहे काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालून ते अल्पसंख्यांकांना देत आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. सोलापुरात पद्मशाली समाज मोठा आहे याचा संदर्भ घेऊन मोदी यांनी सांगितले की अहमदाबादला असताना मी आठवड्यातून एकदा तरी पद्मशाली मित्रांच्या घरी भोजनाला जात असे, म्हणजेच मी पद्मशाली घराचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळेच मला गरिबांसाठी काम करण्याचे प्रेरणा मिळत आहे.

आमच्या सरकारने सामाजिक न्यायासाठी काम केले आहे, गरीब आईच्या मुलाला  मातृभाषेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेत यावं, यासाठी उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी फडणवीस यांचा भाषण झालं ही निवडणूक प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते नसून मोदींना देशाचे नेतृत्व पुन्हा देण्यासाठी आहे. कारण विरोधक इतका मोठा देश  सांभाळू शकत नाहीत हे  आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणSolapurसोलापूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४