मराठी नववर्षारंभ: ९ राशींना वरदान काळ, धनलाभ; नोकरी-व्यापारात यश-प्रगती, स्वामी शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 08:57 AM2024-04-08T08:57:42+5:302024-04-08T09:09:16+5:30

Weekly Horoscope: मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात बुध आणि रवी यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- बुध, रवी, गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, मंगळ आणि शनी कुंभेत, शुक्र, राहू, नेपच्यून आणि रवी मीन राशीत आहेत. ९ रोजी बुध वक्री मीन राशीत येत आहे. तर १३ एप्रिल रोजी रवी मीन राशीतून मेष राशीत येत आहे.

चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. सोमवार, ०८ एप्रिल रोजी दर्श अमावास्या (सोमवती) आहे. मंगळवारी, ०९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. क्रोधीनाम संवत्सर शके १९४६ ची सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्र आणि रामनवरात्र सुरू होत आहे. बुधवार, १० एप्रिल रोजी अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन आहे. गुरुवारी मत्स्य जयंती आहे. गौरी तृतीया आहे. शुक्रवारी विनायक चतुर्थी आहे. शनिवारी श्रीपंचमी, लक्ष्मी पंचमी आहे.

आगामी काळ सांस्कृतिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय चांगला असल्याचे सांगितले जात आहे. या काळात कोणत्या राशींना उत्तम लाभ होणार, नववर्षाची सुरुवात शुभकारक होणार, आर्थिक आघाडी, शिक्षण, वैवाहिक जीवन, कुटुंब, करिअर, बिझनेस, व्यापार यांवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

मेष: अविवाहतांसाठी चांगला काळ आहे. विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्चाचे अंदाजपत्रक बनवावे लागेल. पूर्वी जर एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा भरपूर फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल. उच्च शिक्षणासाठी कालावधी अनुकूल आहे. अपेक्षेनुसार परिणाम मिळेल. सामान्य अध्ययनात एकाग्रता वाढवावी लागेल. दिनचर्येत जर थोडा बदल करणे हितावह ठरू शकेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने कामे होऊ लागतील. मित्रांच्या सहवासात फिरावयास जाण्याची संधी मिळेल. एखाद्या नवीन कामासाठी कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न कराल. बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल. नवीन कर्ज घेणे टाळावे.

वृषभ: आगामी कालावधी उत्तम आहे. प्रणयी जीवनात गोडवा असल्याचे दिसेल. एकमेकांच्या सहवासात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. विवाहितांच्या जीवनात सुख-शांतता नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून पैश्यांची बचत करण्यास शिकून घ्याल. भविष्यात कोणताही आर्थिक त्रास होणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात आपणास नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमले तरी काही मित्रांमुळे मन विचलित होईल. भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. घराची दुरुस्ती व सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल.

मिथुन: पसंतीचा जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्च होतील. अंदाजपत्र बनवावे लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कालावधी उत्तम आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. भरपूर विश्रांती मिळेल. जुन्या आजारातून सुटका होईल. माता-पित्याचे सानिध्य व सहकार्य मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यापारानिमित्त प्रवास होतील, जे सुखावह होऊ शकतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. जे स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागेल.

कर्क: कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत ठरवाल. तेथे जाऊन सर्वजण खुश झाल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवन सुखद होईल. अनेक ठिकाणाहून आर्थिक प्राप्ती होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल काळ आहे. कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम आहे. एखादी मोठी सिद्धी प्राप्त होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण त्रस्त करेल.

सिंह: जोडीदाराबरोबर एकांतात थोडा वेळ घालवाल. कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करू नये, अन्यथा व्यापारावर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. प्रवासाची संधी मिळेल. व्यावसायिक भागीदाराशी संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे स्थान परिवर्तन संभवते. व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आवडीची कामे कराल. मन प्रसन्न होईल.

कन्या: सुखावह काळ आहे. वैवाहिक जीवन सुखद असल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होईल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत परिवर्तन संभवते. व्यवसाय वृद्धीसाठी जे प्रयत्न करत आहात, त्यात यशस्वी व्हाल. स्पर्धेत घवघवीत यशाची संभावना आहे. मन विचलित होऊ देऊ नका. राजकारणात यश प्राप्तीची संभावना आहे. भावंडातील वितुष्टता संपुष्टात येईल. मुलांची फर्माईश आपण पूर्ण कराल. मुलांसह फिरावयास किंवा एखाद्या सहलीस जाल.

तूळ: काही समस्यांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जोडीदाराचे वर्तन काहीसे बदलल्याचे जाणवेल. आर्थिक स्थिती मिश्रित असेल. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्च वाढतील. नोकरी करणाऱ्यांसाठी मध्यम फलदायी काळ आहे. नोकरीत बदली संभवते. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबाच्या भल्यासाठी जोडीदारासह काम करत असल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होईल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. लोकांची ये-जा राहील.

वृश्चिक: आगामी काळ चढ-उतारांचा आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात तणावाचा अनुभव घेतील. पूर्वी जी गुतंवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल. सरकारी क्षेत्राकडून मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता. व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीच्या प्रयत्नात यश प्राप्त होईल. नवीन कंत्राट मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन लाभेल व त्यामुळे ते अध्ययन पूर्ण करू शकतील. दिनचर्येत सकाळचे चालणे, योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट केल्यास हितावह होईल. वडिलांना मनातील विचार सांगाल.

धनु: विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात त्रास जाणवेल. जोडीदार एखादे नवीन कार्य सुरु करेल, ज्यात त्यांना पूर्ण सहकार्य कराल. आर्थिक आघाडीसाठी उत्तम काळ आहे. पैश्यांची आवक राहिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी कालावधी विशेष नाही. मन अभ्यासात रमणार नाही. उच्च शिक्षणासाठी काळ उत्तम आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकत्रित होऊन एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. मनःशांती मिळेल. भावाचे सहकार्य मिळेल.

मकर: विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होतील. संतती सौख्य लाभेल. मनातील विचार आपल्या वडिलांना सांगाल. जे पैतृक व्यवसाय करत आहेत, ते त्यात बदल करतील. रोज प्राप्तीत वाढ झालेली दिसेल. नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. स्पर्धेत यश प्राप्ती होईल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. त्यावेळेस लोकांची ये-जा होईल.

कुंभ: भरपूर ऊर्जा असल्याचे जाणवल्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबीय सुख-शांतीपूर्वक एकत्रित राहतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक भागीदारामुळे फायदा होऊ शकतो. परदेशाशी व्यापार करणाऱ्यांना प्रवासातून भरपूर लाभ होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे.

मीन: आगामी काळ अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटूंबाचे सहकार्य मिळेल. भावंडातील कटुता दूर होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकी मिळेल. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ मिळेल. मुलांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ उत्तम आहे. प्रवासासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. व्यस्ततेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आवडीची कामे कराल. ऋतूमानातील बदलामुळे प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचे दिसू शकते.