शुक्र-सूर्य-राहु त्रिग्रही योग: ८ राशींना शुभ, लॉटरी-शेअर बाजारातून लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:07 AM2024-03-19T07:07:07+5:302024-03-19T07:07:07+5:30

अनेक वर्षांनी जुळून येत असलेल्या या त्रिग्रही योगामुळे नोकरी, व्यवसाय यांमध्ये यश, प्रगतीसह उत्तम फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. लकी ८ राशी कोणत्या आहेत? जाणून घ्या...

मार्च महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे अनेकविध योग जुळून येत आहे. हे योग अनेक वर्षांनी जुळून येत असल्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत असून, मीन संक्रांतीचा काळ सुरू आहे. तर नवग्रहातील क्रूर आणि छाया ग्रह मानला जाणारा राहु मीन राशीत आहे. मार्च महिन्याची सांगता होताना शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.

३१ मार्च रोजी शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य आणि राहु यांच्याशी युती योग, त्रिग्रही योग जुळून येणार आहे. हा योग तब्बल १८ वर्षांनी जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. २४ एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीत विराजमान असणार आहे.

वास्तविक पाहता शुक्र, सूर्य आणि राहु या तीनही ग्रहांचे महत्त्व वेगळे आहे. कुंडलीतील या ग्रहांच्या स्थानानुसार फल, प्रभाव पडत असतो. मात्र, मीन राशीतील या त्रिग्रही योगाचा ८ राशींना उत्तम फायदा, लाभ, नफा मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: उत्पन्नात प्रचंड वाढ दिसू शकते. हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश मिळू शकेल. ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्याल त्याचा फायदा होईल. प्रशंसा मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर मार्केट, लॉटरीतून नफा होऊ शकतो. पैसे हुशारीने गुंतवा.

मिथुन: नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास आनंदी व्हाल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या नोकरीत काही समस्या, अडचणी येत असतील, तर त्या दूर होऊ शकतील.

कर्क: अनेक नवीन संधी मिळतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल. सकारात्मक बदलाची चिन्हे दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळतील. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. अनेक चांगल्या ऑफर्स मिळतील. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतील.

सिंह: आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल. धनलाभ होण्याच्या शक्यतेने अचानक कुठेतरी अडकलेला पैसा मिळू शकतो. शेअर मार्केट किंवा कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवले असतील तर नफा मिळेल. खर्च वाढताना दिसेल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे खर्च अडचणीत आणणार नाहीत. व्यावसायिकांसाठी नफा कमावण्याची संधी येईल. नवीन सौदे मिळू शकतात.

कन्या: कामाच्या ठिकाणी खूप फायदा होईल. नवीन नोकरी मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीत बढती मिळू शकेल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अधिक संधी मिळू शकतील. व्यवसायाशी निगडित लोकांसाठी खूप सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. व्यवसायात अनेक नवीन सौदे मिळू शकतात. व्यवसाय वाढीच्या योजना यशस्वी होऊ शकतात.

वृश्चिक: अनेक प्रकारच्या जॉब ऑफर मिळाल्यानंतर इच्छेनुसार चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. उत्पन्न वाढेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोक अनेक नवीन सौदे मिळविण्यात यशस्वी होतील. व्यवसायात भागीदारी करून मोठा फायदा होऊ शकतो.

कुंभ: वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बचत करू शकाल. दीर्घकाळ दिलेले उधारीचे पैसे परत मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. एक मोठा व्यवसायिक करार अंतिम करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगली रक्कम मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होईल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल.

मीन: आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढल्याने पॉलिसी घेऊ शकता किंवा स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक खूप चांगले परिणाम आणेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. मेहनतीनुसार फळ मिळेल. मेहनत करत राहा आणि यश नक्कीच मिळू शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.