शुक्राचा सिंह प्रवेश: ३ ग्रहांचा अनोखा संयोग, ८ राशींना धनलाभ योग; अपार यश, ३० दिवस सुखाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:03 PM2023-07-07T14:03:57+5:302023-07-07T14:14:03+5:30

सिंह राशीतील प्रवेशानंतर शुक्र मंगळ आणि शनीचा अनोखा योग जुळून येत आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

जुलै महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. ०७ जुलै रोजी रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करत आहे. पुढील काही दिवस शुक्र या राशीत विराजमान असेल. यानंतर शुक्र वक्री होणार आहे.

आताच्या घडीला मंगळ सिंह राशीत विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि मंगळाचा युती योग जुळून येत आहे. इतकेच नव्हे तर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी कुंभ राशीत विराजमान असून, शुक्र आणि मंगळाशी समसप्तक योग जुळून येत आहे. शुक्र आणि मंगळ ग्रह शनी ग्रहापासून सातव्या स्थानी आहेत. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, समसप्तक योग फारसा अनुकूल मानला जात नाही. मात्र, शुक्राचा सिंह राशीत झालेला प्रवेश काही राशींसाठी अतिशय शुभ, लाभदायक मानला जात आहे. तर काही राशींच्या व्यक्तींना पुढील काळात सावधपणे व्यवहार, कामगिरी करावी लागेल. काही समस्या, अडचणींना सामोरे जावे लागू शकेल, असे म्हटले जात आहे. शुक्राच्या सिंह राशीत प्रवेशाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग सकारात्मक ठरू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. आर्थिक स्थिती खूप चांगली होऊ शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीत किरकोळ बदल होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. जुन्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग आनंददायी ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि आनंद वाढेल. स्वतःसाठी वाहन खरेदी करू शकता. कुटुंबासाठी खर्च पैसा होऊ शकतो. नोकरीत स्थिती चांगली राहील. व्यवसायात प्रगती करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग अनुकूल ठरू शकेल. मित्र परिवारात वाढ होऊ शकेल. प्रिय व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. कार्यक्षेत्रात चांगले स्थान मिळू शकते. व्यावसायिकांना प्रवासाचा लाभ होईल.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग लाभदायक ठरू शकेल. व्यक्तिमत्व सुधारेल. बोलण्यात गोडवा आणि प्रेम वाढल्याने लोक आकर्षित होतील. आर्थिक लाभ मिळू शकतात. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर ते तुम्हाला चांगले परिणाम देईल. नोकरदारांना कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. वैयक्तिक जीवन आनंदाने भरलेले असेल. कुटुंबात शुभ कार्य होऊ शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा प्रवेश आणि ३ ग्रहांचा अनोखा योग लाभदायक ठरू शकेल. कामात यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यक्तिमत्त्वाची छाप लोकांवर पडेल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. काम आणि कौटुंबिक जीवन यांच्यात संतुलन राखण्यात यश येईलच असे नाही. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग सकारात्मक ठरू शकेल. परदेशात संपर्क आणि व्यवसाय करतात, त्यांच्या कामात वाढ होईल. परदेशात जायचे असेल तर इच्छा पूर्ण होईल. प्रवासादरम्यान खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. छंदांवर पैसे खर्च करू शकता. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग आर्थिक लाभाचा ठरू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. उत्पन्नात सतत वाढ होईल. पैशांमुळे रखडलेली महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. एक वेगळा आत्मविश्वासही दिसून येईल. नोकरदारांना वेळ खूप फायदेशीर सिद्ध होईल. वरिष्ठ व्यक्ती कामावर खूप समाधानी असतील. आधीच्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. करिअरसाठी खूप महत्त्वाची काळ ठरू शकेल. नोकरीत आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. व्यापार्‍यांसाठी काळ चांगला राहील. कामात चांगली प्रगती होईल. कुटुंबातील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणालाही कर्ज देऊ नका.

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. जीवनात बरेच चढ-उतार येऊ शकतात. वडिलांसोबतच्या नातेसंबंधात बदल दिसेल. गैरसमज वाढू शकतात. घाईगडबडीत काम केल्याने नुकसान होऊ शकते. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल स्पष्टपणे आणि खोलवर विचार करा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगली प्रगती करता येईल. सरकारी धोरणांचा भरपूर फायदा होईल.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही चुकीच्या सवयींमुळे नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरदारांना खूप कष्ट करावे लागतात. व्यावसायिकांना कामात चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुम्हाला निराश वाटू शकते. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून सुख आणि आर्थिक लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग सुखकारक ठरू शकेल. जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद वाढेल. गैरसमज दूर होतील. नवीन व्यवसाय सुरू केल्यास मोठे यश मिळेल. नोकरदारांना कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल.

मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन आणि ३ ग्रहांचा अनोखा योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नोकरीत स्थिती अनुकूल असेल, परंतु कार्यक्षेत्रात अडचणी वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. खर्च वाढेल. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.