सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:01 IST2025-08-17T14:46:51+5:302025-08-17T15:01:27+5:30

Sun Transit in Leo August 2025: स्वराशीत सूर्य महिनाभर असणार आहे. काही उपाय करणे अतिशय शुभ, लाभ-फलदायी ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीवर सिंह संक्रांतीचा प्रभाव कसा असेल? (Surya Gochar Simha Sankranti August 2025)

Sun Transit in Leo August 2025: नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रहाने स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह ही सूर्याचे स्वामीत्व असलेली रास आहे. या राशीत आता पुढील महिनाभर सूर्य विराजमान राहणार आहे. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. त्यामुळे आता पुढील महिनाभराचा काळ हा सिंह संक्रांती म्हणून ओळखला जाईल.

Surya Gochar Simha August 2025: सिंह राशीत आताच्या घडीला छाया, क्रूर ग्रह मानला गेलेला केतु विराजमान आहे. तसेच कुंभ राशीत असलेल्या राहुची समसप्तक दृष्टी सूर्यावर असणार आहे. सूर्य आणि केतुच्या युतीने ग्रहण योगही जुळून आलेला आहे. तसेच शनिशी षडाष्टक योग जुळून आलेला आहे. षडाष्टक योग फारसा अनुकूल मानला जात नाही.

Surya Simha Sankranti August 2025: तसेच सूर्य आणि शनि एकमेकांचे पिता-पुत्र मानले गेले आहेत. असे असले तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रहही आहेत. त्यामुळे आगामी काळ अनेक राशींना काहीसा संमिश्र, तर काही राशींना उत्तम जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत काही उपाय करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. जाणून घेऊया...

मेष: सूर्याचे हे गोचर भ्रमण उत्साहवर्धक व सकारात्मक आहे. कौटुंबिक जीवन सुखावह असेल. समस्या आता संपुष्टात येतील. नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. आर्थिक स्थिती बळकट होईल. पूजा-पाठ व अभ्यासात आपले मन रमेल. कारकिर्दीत चांगले परिणाम मिळतील. मुलांच्या काळजीतून मुक्तता होईल. उपाय: कुंकू मिश्रित पाण्याने रोज सूर्यदेवास अर्घ्य द्यावे.

वृषभ: सूर्याचा सिंहेतील प्रवेश लाभदायी होऊ शकतो. संपत्ती इत्यादींची खरेदी करण्यास हा कालखंड अनुकूल आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस चांगले आहेत. धनलाभाची अपेक्षा करू शकता. गुंतवणुकीतून लाभ होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. शासकीय कार्यातून लाभ होईल. पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे. कारकिर्दीविषयी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. असे असले तरी जमिनीशी संबंधित कार्यात सावध राहावे लागेल. उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायी होईल.

मिथुन: सूर्याचे सिंहेतील भ्रमण लाभदायी होईल. नातेसंबंध दृढ होतील. गोचराचा हा एक महिना अनुकूल आहे. धन प्राप्तीच्या संधी मिळतील. साहस वाढेल. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. एखाद्या नवीन योजनेवर काम करू शकता. उपाय: 'ॐ सूर्याय नमः' मंत्राचा जप शुभ फलदायी होईल.

कर्क: सूर्याच्या सिंहेतील गोचरामुळे अनेक प्रकारचे फायदे होतील. नातेसंबंधांसाठी हे दिवस चांगले आहेत. वैवाहिक जीवन सुखद होईल. धनलाभ होऊ शकतो. गोचराच्या अवधीतील दिवस उमेदीने भरलेले असतील. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. काही खोळंबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. उपाय: रोज सूर्य नमस्कार घालणे फायदेशीर ठरेल.

सिंह: सूर्य याच राशींतूनच भ्रमण करणार आहे. सूर्य राशी स्वामी आहे. राशिस्वामीच राशीतून भ्रमण करत आहे तेव्हा नशिबाची साथ नक्कीच मिळेल. कुटुंबियांशी संबंध दृढ होतील. गोचराच्या प्रभावाने आगामी एक महिना उत्तम असेल. मान-सन्मान प्राप्त होतील. नेतृत्व गुण वाढतील. कार्यक्षेत्री पदोन्नतीसह पगारवाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती बळकट होईल. असे असले तरी खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सध्या अहंकार दूर ठेवावा. तसेच कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा. व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. सर्वत्र चांगला प्रभाव पडेल. लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. वैवाहिक जीवनात गोडी राहील. उपाय: गायत्री मंत्राचा जप करणे लाभदायी ठरेल.

कन्या: सूर्याच्या सिंहेतील गोचर भ्रमणामुळे प्राप्तीत वाढ होईल. नाते संबंधाच्या दृष्टीने हा कालखंड अनुकूल आहे. ह्या दरम्यान परदेशाशी संबंधित कामास अनुकूलता लाभेल. जर एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त असाल तर आता त्यातून मुक्त व्हाल. कामात आपणास यश मिळू शकते. उपाय: रोज सूर्य नमस्कार घालणे फायदेशीर ठरेल.

तूळ: सूर्याचे सिंहेतील गोचर भ्रमण चांगले आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या दरम्यान आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. विविध क्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत. असे असले तरी कारकिर्दीत यश मिळविणे काहीसे त्रासदायी होऊ शकते. परंतु काही उपाय केल्यास ह्या त्रासातून सुटका होऊ शकते. नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. उपाय: भगवान शंकरास जलाभिषेक करणे लाभदायी होईल.

वृश्चिक: सूर्याचे सिंहेतील गोचर भ्रमण अनुकूल आहे. नशिबाची साथ मिळेल. असे असले तरी मेहनत करावी लागेल. कार्यस्थळी स्थिती चांगली असेल. पदोन्नती संभवते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यापारात लाभ होईल. सध्या ध्येयपूर्ती करण्यासाठी खूप मेहनत कराल. खूप आनंदी राहाल. मान-सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. उपाय: सूर्यदेवास पाण्याने अर्घ्य देणे फलदायी होईल.

धनु: सूर्याचे सिंहेतील भ्रमण लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण सुखद व आनंदी राहील. घरात मंगलकार्य होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात कपात होईल. गोचराच्या प्रभावाने कार्यक्षेत्री लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. व्यापारात लाभ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळू शकते. हा कालावधी अत्यंत सकारात्मक आहे. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. उपाय: रविवारी गायीस अन्नदान करणे शुभ फलदायी होईल.

मकर: सूर्याचे हे गोचर अनुकूल आहे. गोचराच्या प्रभावामुळे नातेसंबंध चांगले होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या दरम्यान खर्चात सुद्धा वाढ होऊ शकते. आपण स्वतःसाठी खर्च कराल. ह्या दरम्यान अचानकपणे धनलाभाचा किंवा हानीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी जोखीम असलेली कामे न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उपाय: सूर्यदेवासह शंकराची उपासना करणे शुभ फलदायी होईल.

कुंभ: सूर्याचे सिंहेतील गोचर भ्रमण मिश्र फलदायी आहे. नातेसंबंध सांभाळावे लागतील. नात्यात क्रोधास दूर सारा, अन्यथा कटुतेस सामोरे जावे लागू शकते. ह्या दरम्यान नव्याने काही मैत्री होऊ शकते. सामाजिक व्याप्ती वाढेल. सध्या कोणाशीही संवाद साधताना सतर्क राहावे लागेल, अन्यथा इतरांशी मतभेद वाढू शकतात. उपाय: रविवारी व सोमवारी शंकरास जलाभिषेक करणे फायदेशीर होईल.

मीन: सूर्याचे हे गोचर उन्नतीदायक आहे. नोकरीत नवीन संधी मिळेल. पदोन्नती होऊ शकते. व्यापारात लाभ संभवतो. ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यापारात प्रगती होईल. सध्या शत्रू नुकसान करू शकणार नाहीत. विद्यार्थी अध्ययनात खूपच मेहनत करतील, ज्याचा लाभ त्यांना होईल. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र वा कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होतील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल. उपाय: सूर्याष्टकाचे पठण करणे शुभ फलदायी होईल.