राजयोगाचे वरदान! शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; अपार सुख-समृद्धी, भरभराटीचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 08:24 AM2022-11-04T08:24:05+5:302022-11-04T08:36:01+5:30

शुक्राचा स्वराशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेल्या प्रवेश कोणत्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ ठरू शकेल? जाणून घ्या...

नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. तुळशी विवाह, देवदिवाळी यांसह अनेक शुभ सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी होणार असून, या महिन्यात ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, एक ग्रह चलनबदल करणार आहे. यापैकी शुक्र स्वराशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. (shukra gochar in vrushchik rashi 2022)

शुक्र ग्रह ११ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीत शुक्राच्या आगमनाने काही राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होणार होऊ शकेल. शुक्र ग्रह धन, वैभव, सुखकारक मानला जातो. (venus transit in scorpio 2022)

वृश्चिक राशीत शुक्राचे आगमन झाल्यानंतर दोनच दिवसांनी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत शुक्र आणि मंगळाचा राशी परिवर्तन योग तयार होईल जो राजयोगाप्रमाणे फलदायी ठरेल. अशा स्थितीत वृश्चिक राशीत शुक्र येण्याने अनेक राशींना जबरदस्त लाभ मिळेल. वृश्चिक राशीत शुक्र येण्याने कोणत्या राशींना जबरदस्त फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर लाभदायक ठरू शकेल. तुम्हाला जीवनात अनुकूल परिणाम मिळू शकतील. तुम्ही केलेली कोणतीही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला काही नवीन शिकायचे असेल तर त्याची सुरुवात याच वेळी करणे योग्य ठरेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर अनुकूल ठरू शकेल. तसेच विवाहेच्छूक मंडळींची बोलणी अंतिम टप्प्यात येऊ शकतील. शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्र तसेच अन्य बाबतीत यश आणि प्रगतीचे मार्ग साध्य करू शकाल.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये खूप यश मिळू शकेल. सुखसोयी वाढू शकतील. वाहन किंवा इतर कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवनातही सुख-समृद्धी राहील. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर लाभदायक ठरू शकेल. तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. भागीदारीमध्ये ही गुंतवणूक केल्याने तुम्हाला नफा मिळेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत असल्याचे दिसून येईल. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये अचानक वाढ होऊ शकते. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण दिसेल.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर फायदेशीर ठरू शकेल. या कालावधीत धनलाभ होऊ शकेल. आपण महत्त्वपूर्ण आर्थिक नफा मिळवू शकता. तुमची कोणतीही मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक होऊ शकेल. काही लोकांचा पगार वाढू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकेल.

शुक्रानंतर नवग्रहांचा राजा सूर्य आणि बुधाचेही वृश्चिक राशीत आगमन होणार आहे. या तीनही ग्रहाच्या एकाच राशीत असण्याने अनेक शुभ जुळून येणार आहेत. याचा अनेक राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.