Shani Gochar 2024:शनिकृपेने नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? वाचा राशीभविष्य आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:39 PM2023-12-06T12:39:48+5:302023-12-06T12:50:26+5:30

New Year astrology 2024: २०२४ मध्ये शनी संपूर्ण वर्षभर कुंभ राशीत गोचर करेल, परंतु कुंभ राशीच्या संक्रमणादरम्यान, शनि महाराज २९ जून रोजी पूर्वगामी होतील आणि नंतर १९ नोव्हेंबरला थेट मार्गस्थ होतील. या काळात शनी महाराज वर्षभर पूर्वा भाद्रपदा आणि शतभिषा नक्षत्रात संक्रमण करतील. सन २०२४ मध्ये शनीच्या या संक्रमणामुळे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या कृपेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर अन्य राशींना होणारे लाभ, नुकसान आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया.

मेष राशीचे जे लोक व्यवसाय करतात त्यांना शनीच्या शुभ प्रभावामुळे २०२४ मध्ये मोठा फायदा होणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल आणि या वर्षी तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नोकरदारांचे पगार वाढतील. मुलांच्या प्रगतीबद्दल थोडी काळजी वाटेल. तुमच्या शरीरातील वाढत्या आळसामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मे नंतर, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन दरवाजे उघडतील आणि तुम्ही पैसे वाचवू शकाल. यावर उपाय म्हणून दर शनिवारी काळे तीळ दान करा.

वृषभ राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या संक्रमणाचा फायदा होईल. तुमच्या आयुष्यात अनेक मोठ्या संधी येतील. करिअर असो किंवा व्यवसाय, या वर्षी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या वर्षी तुम्ही चांगली रक्कम साठवू शकाल. कुटुंबासाठी वेळ काढणे तुमच्यासाठी थोडे कठीण जाईल, परंतु तरीही तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे कराल. जून ते नोव्हेंबर या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नोकरी बदलण्याचा विचार करा आणि निर्णय घ्या. यावर उपाय म्हणून महिन्यातून एका शनिवारी गरजू लोकांना कपडे दान करा.

मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी शनीचा संमिश्र प्रभाव दिसेल. या वर्षी तुमच्या अपेक्षेइतके भाग्य तुम्हाला तुमच्या बाजूने मिळणार नाही. लांबचा प्रवास केल्याने तुम्हाला थकवा येईल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटेल. या वर्षी अधिक खर्च होईल आणि आजारावर भरपूर पैसा खर्च कराल. कठोर परिश्रम करूनच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल. तुमचे उत्पन्न वाढेल, परंतु तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. फेब्रुवारी ते मार्चमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. यावर उपाय म्हणून दर शनिवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला.

कर्क राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या अशुभ प्रभावामुळे आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. करिअरच्या बाबतीत तुमचा तणावही वाढू शकतो आणि तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. मे नंतर तुमचा काळ चांगला होऊ लागेल. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम केले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू लागतील. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती सरासरी राहणार आहे. यावर उपाय म्हणून दर शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडा किंवा दान करा.

सिंह राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावामुळे आगामी वर्षात व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या वर्षी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊन तुम्हाला लवकर थकवा जाणवेल आणि कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. मे नंतर तुमचा पैसा काही शुभ कार्यात खर्च होईल. तुमच्या घरात विवाहसोहळा होऊ शकतो. मेहनत केल्याने तुमचा पगार वाढेल. शनि प्रतिगामी झाल्यानंतर तुमच्या करिअरमध्ये तेजी येईल आणि व्यवसायही चांगला होईल. यावर उपाय म्हणून दर शनिवारी काळ्या हरभऱ्याचे सेवन करा.

कन्या राशीच्या लोकांना शनीच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल. या वर्षी तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी कराल आणि तुमच्या घरात समृद्धी आणि आनंदही वाढेल. गरज पडल्यास या वर्षी तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. नोकरीत बदलही होऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. फेब्रुवारी ते मार्च हा काळ करिअरच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. यावर उपाय म्हणून दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

तूळ राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जो काही बदल करण्याचा विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. मे नंतर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत अचानक लाभ मिळेल. शनि संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभ होईल. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल. यावेळी अनावश्यकपणे पैसे खर्च करणे टाळा, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून दर शनिवारी मारुती मंदिरात जावे.

वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि काही कामात अपयश आल्याने तुम्ही निराश व्हाल. मे नंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची कमाई सुरू होईल. या वर्षी तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जवळच्या नातेवाईकाकडून मदत मिळू शकते. तुमचा पगारही वाढेल. जून ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडूनही सहकार्य मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. यावर उपाय म्हणून दर शनिवारी शनी मंदिरात जा.

धनु राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी येतील. मे नंतर तुमचा प्रतिकूल काळ सुरू होईल आणि यावेळी तुम्ही कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक संबंधात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे लक्षणीय वाढू शकते. जून ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी शुभ नाही. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा करिअरबाबत कोणताही निर्णय घेऊ नका. यावर उपाय म्हणून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला.

मकर राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचा खर्च जास्त असेल आणि तुमची कमाई कमी असेल. डोळे आणि छातीशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंधही काही कारणाने खराब होऊ शकतात. कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी फायदे आणि तोटे याचा विचार करा. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. तुमचे खर्च वाढतील आणि कुटुंबात अनावश्यक समस्या वाढू शकतात. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत कोणतेही नवीन काम करू नका. यावर उपाय म्हणून दर शनिवारी मारुती तसेच शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

कुंभ राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागेल. तुमच्या शरीरात अधिक आळस येईल आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. डोळे आणि दातांशी संबंधित समस्या या वर्षी तुम्हाला अधूनमधून त्रास देत राहतील. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्यात अडथळे येऊ शकतात. मे नंतर परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पैसे खर्च कराल. जून ते नोव्हेंबर या काळात शनि प्रतिगामी असल्यामुळे तुमच्या सर्व कामात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू लागतील. यावर उपाय म्हणून दर शनिवारी शमीच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

मीन राशीच्या लोकांना या वर्षी शनीच्या स्थित्यंतरामुळे धन आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला रात्री नीट झोप न लागण्याची समस्या असेल आणि पैशामुळे काही महत्त्वाचे काम शिल्लक राहू शकते. वाढत्या खर्चामुळे तुम्ही वर्षभर खूप चिंतेत असाल. कुटुंबासोबत कुठेतरी सहलीला जाण्याची शक्यता आहे. जून ते नोव्हेंबर दरम्यान तुमचे खर्च अनेक पटींनी वाढतील. तुम्हाला बँकेकडून कर्जही घ्यावे लागेल. तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात आणि तुमचे धैर्य कमी होऊ शकते. यावर उपाय म्हणून दर शनिवारी शनि मंदिरात शनि चालिसाचे पठण करावे.