समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:12 IST2025-05-09T18:00:51+5:302025-05-09T18:12:53+5:30
आगामी काळात जुळून येत असलेल्या ग्रहयोगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मे महिना सुरू आहे. ज्योतिषीय दृष्टीने हा महिना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गुरु ग्रह अतिचारी गतीने गोचर करणार आहे. राहु-केतु राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच एकाच महिन्यात नवग्रहांपैकी ६ ग्रह गोचर करणार आहेत. याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर मोठ्या प्रमाणात पडू शकतो, असे सांगितले जात आहे.
तर नजीकच्या काळात चंद्र वृश्चिक, धनु, मकर राशीत गोचर करणार आहे. तसेच नवग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह कर्क राशीत आहे. या कालावधीत समसप्तक नीचभंग योग जुळून येणार आहे. या ग्रह गोचराचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येणार आहे.
तसेच बुध आणि शनिचा द्विद्वादश योग जुळून येत आहे. शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या सर्व ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...
मेष: बऱ्याच काळापासून रखडलेले काम मित्र, नातेवाईक किंवा सरकारी मदतीमुळे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनुकूल बदल पाहायला मिळू शकतात. कामांना गती मिळू शकेल. विरोधक समर्थन करू लागतील. शुभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकेल.
वृषभ: उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात सामाजिक वर्तुळ विस्तारेल. नवीन मित्र किंवा संबंधांचा फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात टीम प्रोजेक्ट्स आणि ग्रुप अॅक्टिव्हिटीजमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.
मिथुन: कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. तसेच या काळात जीवनात सुख-सोयी आणि सुविधा वाढतील. कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
सिंह: योजना योग्य दिशेने जातील. शुभचिंतक किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने जुन्या समस्येचे किंवा प्रलंबित समस्येचे निराकरण शक्य होईल. मानसिक आणि आध्यात्मिक समाधान मिळू शकेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परदेशात प्रवास करू इच्छिणाऱ्या किंवा तिथे करिअर करू इच्छिणाऱ्यांनाही चांगली बातमी मिळू शकते.
तूळ: दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. विरोधकांना पराभूत करू शकता. कामाच्या ठिकाणी वर्चस्व असेल. कामात मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी स्थिती मजबूत होऊ शकते. आळस सोडला तर खूप फायदे मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकेल.
वृश्चिक: नशिबाच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल. कामासाठी पूर्वी अथक प्रयत्न केले होते त्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामात विशेष लाभ मिळू शकतात. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल ठरू शकेल. हा करार आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. कुठूनतरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
मकर: कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षणाशी संबंधित परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतात. वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. लांबचा प्रवास किंवा तीर्थयात्रा करून बरेच फायदे मिळू शकतात. मुलांची प्रगती होईल.
कुंभ: भावंडे आणि जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. या राशीत साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. संवाद कौशल्याच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकाल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. विचारांद्वारे इतरांना प्रेरणा देऊ शकाल. कामाचे कौतुक होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्याच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे.
मीन: व्यक्तिमत्व सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतील. कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.