नाती सगळेच जोडतात, परंतु नातं निभवावं कसं ते 'या' राशीच्या लोकांकडून शिकायला हवं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 11:32 AM2021-12-03T11:32:03+5:302021-12-03T11:44:29+5:30

नातं जोडणं ही आवड असू शकते पण नातं निभावणं ही एक कला आहे. सगळ्याच लोकांकडून नातं निभावण्याची अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. कारण नात्याची किंमत करणे, त्याचा मान ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीच्या गुण दोषांसकट त्याला स्वीकारणे यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तो मोठेपणा काही लोकांकडे असतो. बाकीचे लोक व्यवहारापुरते नाते जोडतात आणि स्वार्थ संपला की नात्यांकडे दुर्लक्ष करतात.

आजच्या काळात सोशल मीडियावर हजारोने मित्रयादी असली तरी वास्तवात हाकेला धावून येतील असे किती मित्र, आप्त आपल्याजवळ आहेत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. राशी पाहून आपण मैत्री करत नाही हे खरे असले तरी तुम्हाला देखील पुढील राशींच्या व्यक्तींवरून तुमच्या मित्रांच्या स्वभावाची पडताळणी नक्कीच करता येईल असे ज्योतिषशास्त्र सांगते!

शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे वृषभ राशीचे लोक लवकरच इतरांशी पटकन मिसळतात. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ते समोरच्याला आपलेसे करतात. त्यामुळे स्वाभाविकच लोकांचा त्यांच्यावर चटकन विश्वास जडतो. त्या विश्वासाला ते पात्र ठरतात. ते सर्वांशी समतेने वागतात. उत्तम श्रोता म्हणून लोक त्यांची निवड करतात आणि आपल्या अनेक गुजगोष्टी त्यांना सांगणे पसंत करतात.

कर्क राशीचे लोक मनाने स्वच्छ असतात. त्यांना राग लवकर येतो, पण ते तितक्याच लवकर शांत होतात. ते कोणाबद्दलही मनात दीर्घकाळ राग ठेवत नाहीत. जे आहे ते स्पष्टपणे बोलून टाकतात. त्यांच्या स्वभावातला हा पारदर्शकपणा समोरच्या व्यक्तीला भावतो आणि विश्वसनीय वाटतो. हे लोक समोरच्याचा विश्वास कधीच मोडत नाहीत. एकदा जोडलेले नाते शेवट्पर्यंत निभावतात.

तूळ राशीचे लोक रोखठोक असतात. त्यांना नातं आणि व्यवाहार यातला समतोल उत्तमरीत्या सांभाळता येतो. समोरच्याचे दुःखं आपलेसे करून ते नात्यात शेवट्पर्यंत साथ देतात. तूळ राशीच्या लोकांशी इतरांशी चटकन मैत्री होते आणि त्यांनी जोडलेले नाते दीर्घकाळ टिकते.

या राशीचा स्वामी म्हणजे शनी महाराज. त्यामुळे आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात पण उशिरा. त्यामुळे या लोकांच्या संयमाचा कस लागतो. एखादी गोष्ट मिळवण्याची आणि गमावण्याची किंमत ते जाणतात. म्हणून एकदा जोडलेले नाते तोडताना ते १०० वेळा विचार करतात आणि वेळोवेळी परिस्थिती सावरून नेण्यावर भर देतात.

या राशीचे लोक अतिसंवेदनशील असतात. नातं तुटण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नाही. वाद, भांडणं मिटवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्याशी कोणी अबोला धरला तर पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्यांची अवस्था होऊन ते तळमळत राहतात. हे लोक नातं निभावणं आणि नातं टिकवणं यात अग्रेसर असतात.