Samudra Shastra: लग्नाच्या किती वर्षानंतर नवरा बायको दिसू लागतात बहीण भावासारखे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:14 IST2025-03-17T14:01:57+5:302025-03-17T14:14:32+5:30
Samudra Shastra: लग्नानंतर काही जोडपी एकसारखी दिसायला लागतात हे तुम्हीही कुठेतरी ऐकले असेलच. जोडी अनुरूप आहे, इथवर ठीक, पण बहीण भावाइतके साम्य कधी आणि कशामुळे निर्माण होते ते पाहू! इथे उदाहरणादाखल भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नीचा फोटो बघा आणि समुद्र शास्त्र काय सांगते तेही जाणून घ्या!

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी पाहिली असतील, जी अगदी सारखी दिसतात. त्यांना पाहून तुम्हाला वाटले असेल की हे जोडपे नसून भाऊ-बहिण आहेत. लग्नानंतर अनेक जोडपी एकसारखे दिसायला लागतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या संशोधनानुसार, जर एखाद्या जोडप्याने लग्नानंतर त्यांच्या वर्तनात काही सुधारणा आणली तर हे जोडपे शक्य आहे. त्यांच्यातील समानता वाढू शकते. नेमकी कोणत्या बाबतीत? ते पाहू!
एकसारख्या सवयी आणि दैनंदिन जीवन
लग्नानंतर जोडप्यांची दिनचर्या, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली एकसारखी होते. ते एकत्र वेळ घालवतात, एकसमान अन्न खातात आणि समान शारीरिक हालचाली करतात. कधी कधी तर एकमेकांच्या लकबीसुद्धा नकळत अनुसरतात. याचा शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे दोघांमध्ये समानता निर्माण होते.
सायकॉलॉजिकल इफेक्ट
वर्षानुवर्षे एकत्र राहिल्याने, जोडपे आपोआप एकमेकांच्या भावनिक आणि मानसिक प्रभावाखाली येतात. कालांतराने त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, हसण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या सवयी एकसारख्या होतात. त्यामुळे दोघांचे व्यक्तिमत्त्व सारखे दिसू लागतात.
संवाद सातत्य :
ज्या जोडप्यांमध्ये चांगला संवाद असतो, त्या जोडप्यांना एकमेकांचा साद-प्रतिसाद चांगलाच कळलेला असतो. शब्देविण संवादु म्हणतो, तशी त्यांची गत होते. ते एकमेकांच्या नजरेतून परस्परांना काय हवे, नको ते ओळखतात.
बायोलॉजिकल कारण
संशोधनानुसार, एखादे जोडपे दीर्घकाळ एकत्र राहिल्यास त्यांचे चेहरे एकमेकांसारखे दिसू शकतात. ही प्रक्रिया हळूहळू घडते आणि एकत्र घालवलेल्या वेळेनुसार वाढते. अर्थात त्यांच्यात प्रेम असेल, एकमेकांबद्दल ओढ असेल, आत्मीयता असेल तरच या गोष्टी घडतात आणि बघणाऱ्याला त्या चमत्कारिक वाटू लागतात.
हा बदल किती वर्षांनी घडतो?
पूर्वी असे म्हणायचे की लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी जोडपे बहीण भावासारखे दिसू लागते. अर्थात तो काळ वेगळा होता, आता संपर्कांची साधने वाढली. जोडपी दूर असूनही फोन, व्हिडीओ कॉल, मेसेज या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संर्पकात असतात. त्यामुळे हे साम्य निर्माण होण्यासाठी वर्षांचा कालावधी न लागता लग्नानंतर काही काळातच हा बदल दिसू शकतो!