Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:38 IST2025-08-07T13:56:43+5:302025-08-08T16:38:56+5:30

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi: आपल्या आयुष्यातले आपले पहिले मित्र म्हणजे आपले भाऊ-बहीण. ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनानिमित्त हे प्रेमळ शुभेच्छा संदेश पाठवून तुमच्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा!

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया.

सोबतीने बालपण जगलो, जगायचे आहे आता आयुष्यही सोबतीने इतके घडलो, जपायचे आहे आता सारे काही…

लहान असो वा मोठी, बहीण हवी एक तरी पाठिशी प्रेमळ असो वा थोडी चिडकी, बहिण असतेच नेहमी हवीशी

आई उगाच नाही म्हणत “मी नसली की काळजी घेईल ताई” तिलाही माहित असते कधी कधी बहिण सुद्धा बनते आई….

अंधारात असते साथ त्याची आनंदात त्याच्याच कल्ला असतो अनुभवी आणि निरपेक्ष माझ्या भावाचा सल्ला असतो

गत जन्माचे संचित म्हणावे असा लाभला भाऊराया… माणूसकीला नाही तोड तुझ्या अशी निर्मळ वेडी तुझी माया.

भावाचा सल्ला मला कायम विकासाच्या मार्गावर नेतो भाऊच आहे तो माझा जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो

बहिणीचं प्रेम, हृदयात जपायचे असते तीने केलेले त्याग, स्मरणात ठेवायचे असते