पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:51 IST2025-09-16T15:30:18+5:302025-09-16T15:51:06+5:30
Pitru Paksha Indira Ekadashi 2025: यंदाच्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला राजयोग जुळून येत असून, अनेक राशींना हा काळ वरदानाप्रमाणे ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

Pitru Paksha Indira Ekadashi 2025: चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. भाद्रपद वद्य एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते. महाभारतात या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले जाते.

बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी पितृपक्ष इंदिरा एकादशी तिथीला शिव आणि परिघ योगासह अनेक विशेष संयोग निर्माण होत आहेत. परिघ योग रात्री उशिरापर्यंत राहील. त्यानंतर शिव योग असेल. चंद्र स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत असेल. त्यामुळे गौरी योग तयार होईल. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.

या योगांमध्ये एकादशी व्रत आणि श्राद्ध कर्म करणाऱ्यांना पुण्यफळ मिळेल, असे सांगितले जात आहे. तसेच बुध आणि सूर्य कन्या राशीत विराजमान असल्यामुळे बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे. इंदिरा एकादशीचा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? धन-धान्य-वैभव प्राप्तीची संधी कोणत्या राशींना मिळू शकेल? जाणून घ्या...

मेष: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरेल. धनलाभ, व्यवसायातील प्रगती, नोकरीत अनुकूल बदल, शैक्षणिक प्रगती, गृहसौख्य इत्यादी बाबतीत मनासारखे यश मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. काहींना जवळच्या सहलीला जाण्याचा योग येईल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल.

वृषभ: प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. अनेक आघाड्यांवर सफलता मिळेल. अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. त्यामुळे हलके-हलके वाटेल. मात्र, कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे थोडे सावध राहावे लागेल. धनलाभ होईल. मालमत्तेच्या कामात फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.

मिथुन: इच्छा पूर्ण होतील. काही अडचणी असतील. थोडी धावपळ होईल. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा. चैनीवर खर्च कराल, तर अडचणीत याल. परिस्थिती आटोक्यात येईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. शेवटच्या टण्यात व्यावसायिक आडाखे चुकतील.

कर्क: लाभदायक परिस्थितीचा अनुभव येईल. मात्र, फार मोठा निर्णय घेताना अति आत्मविश्वास बाळगू नका. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन घ्या. अचानक पैसा मिळेल. मात्र, हाती आलेला पैसा खर्च होण्यास वेळ लागणार नाही. धार्मिक कार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास घडून येईल. बुधवारपासून अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. अनेक समस्या सुटतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण बदल होतील. मनात आत्मविश्वास राहील.

सिंह: व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. धाडसी पावले उचलली जातील. नोकरीत अचानक नवीन संधी मिळेल. प्रगतीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. बुधवार, गुरुवार अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मोठेपणा मिरवण्याच्या नादात कुणाला आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. मोहात पडू नका.

कन्या: महत्त्वाची कामे आटोपून घ्यावी. अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आळस झटकून टाकला पाहिजे. नशिबाचा कौल बाजूने राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत सुरुवातीला मोठी संधी मिळेल. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरी पाहुणे येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र शुक्रवार, शनिवारी पैसा खर्च होईल.

तूळ: दिवस मनासारखे जातील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. कामाची घाई अडचणीत आणू शकते. नंतर परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. महत्त्व वाढेल.

वृश्चिक: चांगले अनुभव देणारा काळ ठरेल. सुरुवातीला व्यवसायात थोडे सावध राहा. एखादी व्यक्ती अडचणीत आणण्याचा प्रयत्न करील. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका, वाहन जपून चालवा. कामाचा ताण कमी होईल. बुधवारपासून अनुभवायला मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक मान देतील. नोकरीत अनपेक्षित अनुकूल बदल होऊ शकतात.

धनु: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी जाणवतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. फार दगदग होईल अशी कामे करू नका. योजना गुप्त ठेवा. चांगले अनुभव येतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भेटवस्तू मिळतील. बुधवार, गुरुवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्तरार्धात मौजमजा करण्याच्या नादात पैसा खर्च होईल.

मकर: चंद्राचे षष्ठ व अष्टम स्थानातील भ्रमण ताणतणाव वाढवू शकते. त्यामुळे अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्याशी संवाद ठेवा. समाजात वावरताना आपले कोण आणि परके कोण याचा विचार केला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. बुधवार, गुरुवार मजेत वेळ जाईल. व्यवसायात लाभ होईल. प्रवास शक्यतो टाळा.

कुंभ: कामातील बदल फायदेशीर ठरतील. नवीन संधी मिळेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घराच्या देखभालीसाठी वेळ द्यावा लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मात्र कुणी चुकीचा सल्ला देईल. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. आर्थिक उलाढाली जपून करा.

मीन: यशदायक काळ ठरेल. मात्र, भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जवळच्या प्रवासाचे नीट नियोजन करा. व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहारात गुप्तता बाळगा. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. मान-सन्मान मिळेल.

















