palmistry : हातावर असेल 'व्ही', तर पस्तीशीनंतर हमखास 'व्हिक्टरी'; जाणून घ्या या Lucky Sign बद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:02 PM2022-09-28T18:02:40+5:302022-09-28T18:09:04+5:30

Palmistry : ज्योतिष शास्त्राच्या अनेक शाखा आहेत. कोणी कुंडली पाहून भविष्य सांगतात, तर कुणी संख्याशास्त्र, हस्तरेषा, सामुद्रिक शास्त्र इत्यादी शास्त्रांच्या आधारे भविष्य कथन करतात. यातील एक शाखा अर्थात हस्तरेषांवरून भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा मागोवा घेता येतो. आज आपण हातावरील भाग्यशाली चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत.

असे म्हणतात की आपले भविष्य आणि नशीब आपल्या हाताच्या रेषांमध्ये दडलेले असते. पण त्यातील अभ्यासाशिवाय या रेषांचा नेमका अर्थ उलगडणार नाही. अनेक वेळा आपल्या हातात अशा भाग्यशाली खुणा असतात, ज्याची आपल्याला माहिती नसते. परंतु ते चिन्ह तुमच्या भाग्योदयाचे संकेत देतात. वास्तविक, हातावर नैसर्गिकरित्या तयार झालेले V चिन्ह देखील भाग्यवान मानले जाते.

ज्योतिषांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या रेषा वेगवेगळ्या असतात. त्या रेषा व्यक्तीचे वैवाहिक जीवन, संतानसुख, आर्थिक स्थिती इत्यादींबद्दल भाकीत करतात. तिथेच भाग्योदयाच्या काही खुणा असतात. ज्यामध्ये V चे चिन्ह हृदय रेषेच्या अगदी खाली आणि तर्जनी आणि मधले बोट यास्थानी आहे का तपासले जाते. ते तिथे स्थित असल्यास या चिन्हाचा अर्थ जाणून घ्या!.

हस्तरेषा ज्योतिषांच्या मते, ज्या लोकांच्या हातात हे V चिन्ह असते, ते खूप भाग्यवान असतात. हे लोक चांगले आणि आनंदी जीवन जगतात. या लोकांसोबत राहणाऱ्या लोकांवरही त्यांच्या सकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि ते लोकही आनंदी जीवन जगतात. या लोकांना एकनिष्ठ आणि समजूतदार जीवनसाथी मिळतो.

ज्योतिषांच्या मते, जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतो तेव्हा अशा लोकांची गरज असते, जे दुःखाच्या वेळी साथ देऊ शकतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या हातात V चिन्ह आहे, अशा लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा हे लोक नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. या लोकांवर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकतो.

V चिन्ह असलेल्या लोकांबद्दल असेही म्हटले जाते की सुरुवातीला त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. समाजात मान-सन्मान फारसा मिळत नाही. मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. पण वयाच्या ३५वर्षांनंतर या लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू लागतात. करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत हे लोक झपाट्याने प्रगती करतात आणि जीवनात भरपूर यश मिळवतात.