५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:49 IST2025-09-25T14:43:06+5:302025-09-25T14:49:58+5:30
Durga Devi Favorite Rashi: कायम देवीची उपासना करणारे हजारो लोक आहेत. परंतु, अशा काही राशी आहेत, ज्या दुर्गा देवीच्या अत्यंत प्रिय मानल्या जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Durga Devi Favorite Rashi: २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्र आहे. आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून आहे. देवीच्या भक्तिपरंपरेचा उगम अतिप्राचीन कालाएवढा मागे जाऊ शकतो. वैदिक काळातही देवीची उपासना रूढ होती.
दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप-जाप, होम-हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात.
दुर्गा देवीची कृपा लाभण्यासाठी अनेक गोष्टी आचरल्या जातात. केवळ नवरात्रात नाही, तर वर्षभर देवीची उपासना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर कायम दुर्गा देवीचे लक्ष असते. आयुष्यभर कृपा लाभू शकते. कधी कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही, भरभराट होते. धन-धान्य-समृद्धी वृद्धी होते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
वृषभ: वृषभ राशीचे लोक कठोर परिश्रमाने प्रत्येक टप्पा गाठतात. प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देतात. वृषभ राशीमध्ये प्रचंड धैर्य आणि शौर्य असते, जे त्यांना देवी दुर्गेकडून मिळते. ते घाईघाईने निर्णय घेत नाहीत किंवा घाईघाईने कृती करत नाहीत; पुढे जाण्यापूर्वी ते संयमाने निर्णय घेण्यावर विश्वास ठेवतात. या राशीच्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्वगुण असतात. ते कठीण परिस्थितीतही कधीही मागे हटत नाहीत. हे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात. जीवनात मोठी उंची गाठतात. या राशीच्या लोकांवर देवी दुर्गा विशेष आशीर्वाद देते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आव्हानांना घाबरत नाहीत, त्यांना धैर्याने तोंड देतात.
कर्क: दुर्गा देवीच्या आशीर्वादाने कर्क राशीचे लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यशस्वी होतात. या राशीच्या लोकांचे त्यांच्या आईशी घट्ट नाते असते. कामे शांत मनाने करतात. धार्मिक कार्यात खूप रस असतो. देवी मोठ्या समस्यांपासून दूर ठेवते. हे लोक बुद्धिमान, मेहनती आणि जबाबदार असतात. व्यावहारिक मानसिकता असते. कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. सामाजिक कार्यात विशेष रस असतो. सेवा करण्याची वृत्ती मने जिंकते. दुर्गा देवीच्या विशेष आशीर्वादाने जीवनातील सर्वांत कठीण आव्हानांवर सहज मात करतात. यशाच्या शिखरावर पोहोचतात.
सिंह: ही राशी देवीची विशेष आवडती मानली जाते. हे लोक उत्साही, धाडसी आणि धार्मिक असतात. त्यांचे भाग्य नेहमीच त्यांच्या बाजूने असते. संकटाच्या वेळी हे लोक शहाणपणाने वागतात. ते त्यांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळवतात. इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. सिंह राशीचे लोक नेहमीच उत्साही असतात. दुर्गा देवीच्या आशीर्वादामुळे नेहमीच चांगले होत असते. परिस्थिती किती कठीण असली तरी, ते प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक बनवण्याचे शहाणपणाने प्रयत्न करतात. ते नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात. करिअर, व्यवसायात लक्षणीय प्रगती करण्यास तयार असतात.
कन्या: कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. खूप उत्साही असतात. ते नेहमीच सर्वांना मदत करण्यास तयार असतात. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने कामे पूर्ण होतात. देवी दुर्गाच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा अडथळा जास्त काळ टिकू शकत नाही. ते उत्साही आणि संवेदनशील आहेत आणि ते सर्वांचे कल्याण शोधतात.
धनु: या राशीचा स्वामी गुरू आहे. धनु राशीचे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम असतात. ज्ञानाने सर्वांना मार्गदर्शन करतात. नोकरी आणि व्यवसायात असलेले लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. आदर मिळवतात. या लोकांमध्ये प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची क्षमता असते. ते समाजात नेतृत्वाची भूमिका घेतात. त्यांच्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात. प्रगतीच्या संधी शोधतात. देवी दुर्गेच्या विशेष आशीर्वादाने हे लोक जीवनात प्रगती करत राहतात. आदर आणि प्रतिष्ठा मिळवतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.