मंगळ वक्री, सूर्याशी षडाष्टक योग: ६ राशींचे मंगल, लाभच लाभ; भाग्याची साथ, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:13 IST2024-12-06T13:01:49+5:302024-12-06T13:13:17+5:30

मंगळाचे वक्री होणे अनेक राशींना लाभाचे, फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आताच्या घडीला कर्क राशीत विराजमान आहे. मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होत आहे. ०७ डिसेंबर २०२४ रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होत असून, २४ फेब्रुवारीपर्यंत वक्री अवस्थेत असणार आहे.

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करत आहे. धनु राशीतील सूर्याचे गोचर खरमास म्हणून ओखळले जाते. तसेच आगामी महिन्याभराचा काळ धनु संक्रांत म्हणून ओळखला जाणार आहे. धनु राशीत प्रवेश केल्यावर मंगळ आणि सूर्याचा षडाष्टक योग जुळून येणार आहे.

मंगळ वक्री होणे आणि सूर्यासोबतचा षडाष्टक योग अनेक राशींना अनुकूल सकारात्मकता देणारा ठरू शकतो. वैविध्यपूर्ण लाभ होऊ शकतात. अनेक फायदे मिळू शकतात. नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडी यांवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया...

कर्क: हा काळ चांगला जाऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. पालकांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या: आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकेल. मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर मोठे यश मिळवू शकता. नोकरी करत असाल तर बढती मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

धनु: मंगळ आणि सूर्याचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपण्याची चिन्हे आहेत. अनपेक्षित फायदे मिळू शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. मात्र अनावश्यक खर्च टाळावा.

मकर: मंगळ वक्री होणे शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ लाभदायक राहील. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात लाभ होऊ शकतो.

कुंभ: आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात यश मिळू शकते. बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. कामाचे कौतुक केले जाऊ शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

मीन: करिअरमध्ये चांगले बदल होऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल. समाजात ओळख निर्माण होऊ शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. खूप फायदा होऊ शकेल. अनेक इच्छा पूर्णही होऊ शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.