जया एकादशी: ७ राशींना जय-विजय, धनलक्ष्मी होईल प्रसन्न; पदोन्नती योग, विविध प्रकारचे शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:09 IST2025-02-06T14:48:45+5:302025-02-06T15:09:50+5:30
Magh Jaya Ekadashi February 2025: जया एकदाशीचे महत्त्व अनन्य साधारण असून, कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Magh Jaya Ekadashi February 2025: माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक पुण्य फलदायी व्रते, सण साजरे केले जातात. अनेकार्थाने माघ महिना अनन्य साधारण मानला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत आचरले जाते. या एकादशी व्रतांची नावे वेगवेगळी असतात. या नावांवरून त्या एकादशीचे महात्म्य आणि महत्त्व अधोरेखित होते.
माघ शुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशी आहे. या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.
प्रत्येक एकादशीला श्रीविष्णूंची पूजा केली जाते. श्रीविष्णूंशी संबंधित स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप केले जातात. नामस्मरण केले जाते. एकादशीला विष्णू सहस्रनामाचे पठण करणे पुण्यफलदायी मानले जाते. एकंदरीत ग्रहमानाचा विचार करता, जया एकादशीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशीला कसा लाभ मिळू शकतो? जाणून घ्या...
मेष: प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. त्यामुळे अडचणी येतील. कालांतराने शुभ फळे मिळतील. महत्त्वाची कामे होतील. धनलक्ष्मीची कृपा असल्याचा अनुभव येईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
वृषभ: ग्रहमानाच्या अनुकूलतेचा अनुभव येईल. कालांतराने फायदा होऊ शकेल. योजनांच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत संपर्क होईल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. परंतु, अचानक काही खर्च उद्भवतील. प्रवासात सतर्क राहा. कायद्याची बंधने पाळा. शुभ फळे मिळतील.
मिथुन: काही किरकोळ अपवाद वगळता यश मिळण्याचे योग येतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला सतत कार्यरत राहावे लागेल. वडिलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील. उलाढाली जपून करा. मनात आध्यात्मिक विचार राहतील. मनात आनंदी विचार राहतील.
कर्क: नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात रस राहील. अनेक अडचणी दूर होतील. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. नशिबाचा कौल बाजूने राहील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. नवीन ओळखी होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. अनाहूत पाहुणे मंडळी येतील.
सिंह: फार घाईघाईत कामे करू नका. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. लोकांना स्वतःहून सल्ला देणे शक्य होईल तेवढे टाळा. भाग्याची चांगली साथ राहील. विदेश यात्रा किंवा दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. मान-सन्मान मिळेल. नोकरीत महत्त्व वाढेल. नातेवाईक भेटतील.
कन्या: सामाजिक मान-सन्मान प्राप्त होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सुरुवातीला मनात काही शंका असतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमज होऊ देऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नदी, समुद्रकिनारी अचाट साहस करू नका. अचानक धनलाभ होईल.
तूळ: थोडी द्विधा मनःस्थिती राहील. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. नाही तर काही लोक कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करू नका. मनात आनंदी विचार राहतील. एखादी चांगली बातमी कळेल. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल.
वृश्चिक: सुरुवातीला काही चांगले अनुभव येतील. एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. आपले कोण आणि परके कोण, हे नीट ओळखा. शुभ फळे मिळतील. विवाहेच्छुकांना अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. वाहन जपून चालवा.
धनु: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेतली जाईल. थोडी धावपळ होऊ शकते. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.
मकर: ग्रहमानाच्या अनुकूलतेचा फायदा घ्यावा. कामे वेळच्या वेळी करून घ्यावी. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. कामानिमित्त फिरावे लागेल. सुरुवातीचे दोन दिवस मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक प्रगती होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल.
कुंभ: हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण कराल. कार्यक्षेत्रात दबदबा राहील. नवीन पद, बढती, बदली मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात भरभराट होईल. मोठे आर्थिक निर्णय जपून घ्यावे. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी कळेल.
मीन: कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. सहकारी वर्गाशी गोडीत वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावध राहा. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.