Lunar Eclipse 2023: तूळ राशीत चंद्रग्रहण: ६ राशींना शुभ लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:19 PM2023-05-04T14:19:47+5:302023-05-04T14:28:43+5:30

Lunar Eclipse 2023: चंद्रग्रहण कधी लागणार? तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

सन २०२३ जे पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्धपौर्णिमेला लागणार आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. ०५ मे रोजी लागणारे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकरातील आहे. (Lunar Eclipse May 2023)

०५ मे २०२३ रोजी लागणारे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील आहे. ०५ मे २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार आहे. तर रात्रौ १० वाजून २३ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तसेच मध्यरात्रौ ०१ वाजून ०२ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. तूळ राशीत स्वाती नक्षत्रात चंद्रग्रहणाचा आरंभ होणार आहे. तर ग्रहणाचा मध्य आणि मोक्ष विशाखा नक्षत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे वेधादि नियमही पाळू नये, असे सांगितले जाते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकतात. चंद्रग्रहण खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला महत्त्व आहे. चंद्रग्रहणाचा प्रभाव देश-दुनियेवर पडतो, तसाच तो १२ राशींवरही पडणार असल्याचे सांगितले जाते. काही राशींना हे चंद्रग्रहण शुभ प्रभाव देणारे ठरू शकेल, तर काही राशींना हा काळ संमिश्र ठरू शकतो. तुमची रास कोणती, तुमच्यावर चंद्रग्रहणाचा प्रभाव कसा असेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण काहीसे संमिश्र ठरू शकते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. चिडचिड वाढू शकते. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. घरातील वातावरणही बिघडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणतेही नवीन काम सुरू न करणे हिताचे ठरू शकेल. मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. शक्य असेल तर टाळावी.

वृषभ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण मध्यम फलदायी ठरू शकेल. खर्च वाढू शकतो. मन चंचल होऊ शकते. मानसिक ताण येऊ शकतो. घाईत किंवा भावनेने कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कौटुंबिक संबंधांमध्ये चढ-उताराची परिस्थिती येऊ शकते. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण लाभदायक ठरू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतील. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात सामंजस्य वाढू शकेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या प्राप्त होऊ शकतील. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकेल. मिथुन राशीत जुळून आलेल्या शुक्र आणि मंगळाच्या युती योगाचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. काम काही कारणास्तव अडकू शकते. धावपळ करावी लागू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी वाद होऊ शकतो. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्यावे. वाद-विवादांपासून दूर राहावे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. मुलांच्या विवाहात काही प्रकारचा अडथळा येऊ शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण शुभ फलदायी ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकेल. या राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात काही चांगले बदल दिसून येऊ शकतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे स्थान अधिक चांगले आणि मजबूत होऊ शकेल. धाडसी निर्णयांचा फायदा होऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. विशेष सावधगिरी बाळगावी लागू शकेल.मोठे व्यवहार टाळावे. पैसे वाचवण्यातही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. नोकरदारांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण काहीसा समस्याकारक ठरू शकतो. कोणत्याही राजकीय चर्चेपासून दूर राहावे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगावी. मित्रांना कोणत्याही गुप्त गोष्टी सांगणे टाळावे. भावंडांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. थोडी सहनशीलता ठेवणे हिताचे ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण शुभ-लाभदायी ठरू शकेल. धनलाभाची संधी प्राप्त होऊ शकते. नोकरदार वर्गाला चांगल्या संधी तसेच चांगली पगारवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलांची प्रगती पाहून मन आनंदी होईल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील.

मकर राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकेल. नोकरदार वर्गाला आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. व्यवसाय, बिझनेस करणाऱ्यांना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात दबाव आणि तणाव असला, तरी त्यातून आपल्याला चांगला फायदा मिळू शकेल. भौतिक सुख-साधनांची प्राप्ती होऊ शकेल. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकेल. भाग्याची साथ लाभू शकेल. वडिलांशी नाते दृढ होऊ शकेल. लाभ मिळू शकेल. तुम्हाला धर्म-अध्यात्मात रस वाढू शकेल. प्रवास हा शुभकारक ठरू शकतील. गुंतवणुकीचा आणि केलेल्या कामांचा लाभ मिळू शकतो.

मीन राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण शुभकारक ठरू शकेल. चांगला लाभ होऊ शकतो. अचानक काही चांगली बातमी मिळू शकेल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मानसिक समस्या राहू शकते. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव राहू शकतो. आरोग्याबाबत थोडे सावध राहावे.

चंद्रग्रहणाला गुरु, सूर्य, बुध, राहु हे ग्रह मेष राशीत विराजमान असतील. तर मंगळ आणि शुक्र हे ग्रह मिथुन राशीत असतील. केतु तूळ राशीत असेल. शनी कुंभ राशीत असेल. चंद्रग्रहणाला मंगळ आणि बुधाचा परिवर्तन योग जुळून येईल, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.