कोजागिरी पौर्णिमा: ४ राशींना गजकेसरी योगाचा लाभ, चंद्रग्रहण ठरेल शानदार; लक्ष्मी शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:07 PM2023-10-20T12:07:09+5:302023-10-20T12:17:20+5:30

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत असून, ४ राशींना अतिशय शुभ काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. हे खंडग्रास प्रकारातील चंद्रग्रहण असून, भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा वेधारंभ २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजून १० मिनिटांपासून सुरु होत असून, चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्रौ ०१ वाजून ०५ मिनिटांनी होणार आहे. रात्रौ ०१ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तर ग्रहणाचा मोक्ष रात्रौ ०२ वाजून २३ मिनिटांनी होईल. ग्रहणाचा पर्वकाल ०१ तास १८ मिनिटे असेल.

कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाला शुभ योग जुळून येत आहेत.

चंद्रग्रहणावेळी चंद्र मेष राशीत असेल. मेष राशीत गुरू आणि राहु दोन ग्रह आहेत. मेष राशीत चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग जुळून येत आहे. याशिवाय चंद्रग्रहण सुरू होताना सिद्ध योग जुळून येत आहे. शनी मूळ त्रिकोण राशीत असून, शश नामक शुभ राजयोग तयार होत आहे. तसेच तूळ राशीत सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.

एकूण ग्रहस्थिती आणि जुळून असलेल्या अनेक राजयोग, शुभ योगांचा उत्तम प्रभाव काही राशींवर पडेल असे सांगितले जात आहे. कोजगिरी पौर्णिमा असून, लक्ष्मी देवीच्या कृपेने वैभव, सुख-समृद्धी वृद्धी होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या ४ राशींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण अतिशय शुभ लाभदायी, पुण्यफलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण शुभफलदायी ठरू शकेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीनेही अनेक शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सोबत काम करत असलेल्या लोकांपासून थोडे सावध राहा. कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप छान असणार आहे. व्यवसाय करत असाल तर मोठी रक्कम मिळू शकते. आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण अतिशय खास ठरू शकते. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरशी संबंधित अनेक उत्तम संधी मिळतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकाल. नातेवाईकांमध्येही प्रतिमा सुधारेल. प्रभाव वाढेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. प्रभाव वाढेल. कार्यालयात कामाला नवी ओळख मिळेल. व्यवसायात नवीन आणि चांगला भागीदार मिळू शकेल. करिअरशी संबंधित अनेक संधी येतील. आर्थिक स्थितीही बरीच सुधारणार आहे. कुठून तरी भरपूर पैसे मिळाल्यास दिलासा मिळू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण जीवनात नवीन आनंद घेऊन येणारे ठरू शकेल. आनंद आणि समृद्धी वाढेल. काम करत असलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये चांगले परिणाम मिळतील. पैशांची बचत केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी मिळणार आहे. समाजात सन्मान वाढेल.

तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतु यांचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. याशिवाय मेष राशीतील गुरु आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.